05 March 2021

News Flash

भटक्या कुत्र्यांचा हल्ला, पुण्यात चार वर्षांच्या मुलाला पडले १७ टाके

आंबेठाण परिसरात लांडगे कुटुंब राहत असून कुटुंबातील चार वर्षांचा राजवीर हा बुधवारी दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर घरासमोरील शेतात मित्रांसोबत खेळत होता.

राजवीर या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चाकणमधील आंबेठाण परिसरात चार वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला असून यात चिमुकला गंभीर झाला आहे. त्या मुलाला सतरा टाके पडले असून या घटनेमुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

चाकणच्या आंबेठाण परिसरात लांडगे कुटुंब राहत असून कुटुंबातील चार वर्षांचा राजवीर हा बुधवारी दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर घरासमोरील शेतात मित्रांसोबत खेळत होता. काही वेळाने तो लघुशंकेसाठी शेतालगतच्या जागेवर गेला. तिथे भटक्या कुत्र्यांनी राजवीरवर हल्ला केला. भटक्या कुत्र्यांनी त्याच्या पायाचे लचके तोडले.

घाबरलेला राजवीर मदतीसाठी ओरडू लागला. सुदैवाने त्याच्या आईने राजवीरचा आवाज ऐकला आणि तिने घटनास्थळी धाव घेत राजवीरची सुटका केली. राजवीर या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजवीरला सतरा टाके पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 1:21 pm

Web Title: stray dog attack on 4 year old boy in chakan
Next Stories
1 कोंडीमुक्त हिंजवडीसाठी ‘आयटी’ लढा
2 उद्योगांच्या यशस्वितेसाठी शेअर बाजारात नोंदणी आवश्यक!
3 स्थळ विशेष : अद्ययावत सुविधांनी सुसज्ज ‘प्रभु ज्ञानमंदिर’
Just Now!
X