26 February 2021

News Flash

उपासमारीमुळे पिंपरीत भटक्या कुत्र्यांच्या मृत्यूचे सत्र

महापालिकेचे कानावर हात

महापालिकेचे कानावर हात

पिंपरी : करोना विषाणूंमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात उपासमार झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात ३०० ते ४०० भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. आकुर्डी, भोसरी, सांगवी, प्राधिकरण आदी परिसरात याचे प्रमाण लक्षणीय आहे. महापालिकेने अशाप्रकारे भटक्या कुत्र्यांचे मृत्यू होत असल्याची कबुली देतानाच हे प्रमाण मात्र अत्यल्प असल्याचा दावा केला आहे.

मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने टाळेबंदी लागू करण्यात आली, त्यामुळे सगळीकडील दुकाने, बाजारपेठा, हॉटेल, मंगल कार्यालये, टपऱ्या, चायनीजच्या गाडय़ा आदी ठिकाणे बंदच आहेत. याशिवाय, ज्या-ज्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाण्यासाठी पदार्थ मिळू शकतील, ती सर्व ठिकाणे बंद आहेत. पालिकेकडून ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्याचे काम कटाक्षाने केले जाते. त्यामुळे त्या मार्गाने मिळणारे खाद्यही त्यांना  मिळत नव्हते. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे, भटक्या कुत्र्यांची उपासमार होऊ लागली आणि त्यातच त्यांचे मृत्यू होऊ लागले. एप्रिल महिन्याच्या अखेरीस रस्त्यावर, उकिरडय़ांवर आदी ठिकाणी भटकी कुत्री मृतावस्थेत आढळून येऊ लागली. त्यानंतर हे सत्र सुरूच राहिले. आतापर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत ३०० ते ४०० पर्यंत भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे खात्रीलायक सांगण्यात येते. मात्र, महापालिकेने या संदर्भात कानावर हात ठेवले आहेत.

टाळेबंदीच्या काळात सगळंच ठप्प राहिल्याने भटक्या कुत्र्यांना खायला मिळाले नाही, त्याचा परिणाम म्हणजे, अनेक ठिकाणी त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पालिकेकडे प्राप्त तक्रारीनुसारच नोंद केली जाते. नागरिकांकडून तक्रार प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाते. तसेच, मृत कुत्र्यांना पालिकेकडून दफन केले जाते.

– अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरी पालिका

आकुर्डी परिसरात दहा भटक्या कुत्र्यांसह काही पिलांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला आहे. पालिकेची पथके येतात आणि जातात, पुढे काय होते नेमके स्पष्ट होऊ शकले नाही. पालिकेने ठोस अशी कार्यवाही केल्याचे दिसत नाही.

– प्रमोद कुटे, नगरसेवक, आकुर्डी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:46 am

Web Title: stray dogs death in pimpri due to starvation zws 70
Next Stories
1 करोनाबरोबरच विषाणूजन्य आजाराची साथही दाखल
2 सततच्या टाळेबंदीने चप्पल, बॅगविक्रेत्यांची परवड
3 दूरदर्शनला प्रस्तावाविनाच कार्यक्रमाचा डंका
Just Now!
X