News Flash

पाळीव कुत्र्याच्या मृत्यूचा शोक अनावर झाल्याने युवकाची आत्महत्या

मूळचा छत्तीसगड येथील असणारा हा विद्यार्थी सिंबायोसिस महाविद्यालयात शिकत होता.

आपल्या पाळीव कुत्र्याच्या मृत्यूचा शोक अनावर झाल्याने एका युवकाने आत्महत्या केली (संग्रहित छायाचित्र)

आपल्या पाळीव कुत्र्याच्या मृत्यूचा शोक अनावर झाल्याने पुण्यात शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली. पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना शहरातील हडपसर भागात सोमवारी घडली. पाळीव कुत्र्याच्या मृत्यूमुळे आपणास अतोनात दुःख झाले असून आपण आत्महत्या करीत आहोत असे त्या युवकाने मृत्यूपूर्वी लिहून ठेवल्याचे उघडकीस आले आहे.

कनवर हर्षवर्धन राघव असे या २२ वर्षीय मुलाचे नाव आहे. तो सध्या ठक्कर एनक्लेव्ह, रक्षकनगर, हडपसर येथे राहत होता. त्याचे मूळ गाव रायपूर असून त्याचे वडील लष्कराधिकारी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राघव सिंबायोसिस महाविद्यालयात एमबीए करीत होता. सोमवारी पहाटे त्याने तो राहत असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. पोलिसांनी त्याची डायरी पाहिली. त्यात माझा कुत्रा सिसका याचा मृत्यू झाला आहे. त्याचा विरह मला सहन होत नाही. माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये असे त्याने लिहून ठेवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 10:27 pm

Web Title: student commit suicide youth can not tolerate dog died pune
Next Stories
1 पुण्यात अंमली पदार्थसह एका नायजेरियन नागरिकास अटक
2 राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणाऱ्या चौघांना जामीन
3 पुण्यात नवा फ्लॅट बघताना ९व्या मजल्यावरुन पडून महिलेचा दुर्देवी अंत
Just Now!
X