चिन्मय पाटणकर

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा विषय घेऊन अभ्यासक्रमातील एक सत्र शिक्षण संस्थेबाहेर जाऊन शिकण्याची संधी मिळू शकणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) ‘स्टुडंट सेमिस्टर आऊटरीच’ या संकल्पनेला तत्त्वत: मान्यता मिळाली असून, येत्या काही काळात ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शके ल.

परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये स्टडी अ‍ॅब्रॉड म्हणजे देशाबाहेर जाऊन शिकण्याची सुविधा विद्यार्थ्यांना दिली जाते. मात्र, भारतातील विद्यापीठांमध्ये अशी सुविधा नाही. विद्यार्थ्यांना त्यांचा छंद, आवडीचा प्रत्यक्ष शिक्षणातही उपयोग होत नाही. ही उणीव दूर करून शिक्षण व्यवस्थेत मोकळीक आणण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग ‘स्टुडंट सेमिस्टर आऊटरीच’ ही अभिनव योजना प्रत्यक्षात आणणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारत आहे. त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा विषय घेऊन एक सत्र प्रत्यक्ष समाजात जाऊन शिकण्याची संधी मिळेल.

योजनेच्या संकल्पनेची माहिती देताना डॉ. पटवर्धन म्हणाले, की वर्गात मिळते तेच शिक्षण असा समज आपल्याकडे आहे. मात्र, वर्गातील औपचारिक शिक्षणापलीकडेही शिकण्यासारखे खूप काही असते. शिक्षणेतर उपक्रमही खूप महत्त्वाचे असतात. मात्र, सध्याच्या व्यवस्थेत त्यांना फार महत्त्व दिले जात नाही. विद्यार्थ्यांचे संगीत, चित्रकला छंद, विविध खेळ, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना अशा योजनांकडेही अभ्यासेतर उपक्रम म्हणूनच पाहिले जाते. या योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राशिवाय शैक्षणिक फायदा मिळत नाही. ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न ‘स्टुडंट सेमिस्टर आऊटरीच’द्वारे के ला जाणार आहे. ही योजना विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपाची असेल. या योजनेमध्ये एका सत्रासाठी श्रेयांक देऊन ते नॅशनल अ‍ॅके डमिक क्रे डिट रिपॉझिटरीअंतर्गत साठवले जाऊ शकतात. त्यामुळे बाहेर पूर्ण के लेल्या सत्राचा विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा होऊ शकतो. या योजनेत विद्यार्थी शैक्षणिक संस्थेबाहेर जाऊन काम करू शकणार असले, तरी त्यांना एक प्राध्यापक जोडून दिला जाईल. त्यामुळे दर महिन्याला अहवाल, प्रकल्प संबंधित प्राध्यापकाला सादर करावा लागेल.

‘विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशिवाय वेगळे काही करायची, शिकायची संधी या योजनेत मिळेल. ललित कला, खेळ, संशोधन, नवसंकल्पना यांना या योजनेमुळे चालना मिळेल. शहरी भागातील विद्यार्थी शेतकऱ्यांबरोबर राहून त्यांचे काम समजून घेऊ शकतील, तर ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरातील सुधारणा पाहून त्या ग्रामीण भागात नेता येतील का याचा विचार करू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना समाजाच्या स्थानिक पातळीवर काय घडते आहे याची जाणीव होऊन ते अंतर्मुख होऊ शकतील. त्याचा फायदा विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी होईल. तसेच शिक्षणातूनच विद्यार्थ्यांचे मूल्यशिक्षणही होईल. शहरे-ग्रामीण भाग यांच्यात आदानप्रदान सुरू होऊ शकेल. त्यातून शिक्षणाचे एका अर्थाने रूपडे पालटू शकेल,’ असेही डॉ. पटवर्धन यांनी नमूद केले.

समाजात विद्यापीठ, विद्यापीठात समाज

आजच्या घडीला विद्यापीठे आणि समाज एकमेकांपासून दूर आहेत. या योजनेमुळे विद्यार्थी समाजात जाऊन काम करू शकणार असल्याने समाजात विद्यापीठ पोहोचू शके ल. तर विद्यार्थ्यांनी के लेल्या कामामुळे विद्यापीठात समाजाचे प्रतिबिंब उमटेल, असेही डॉ. पटवर्धन यांनी नमूद केले.

नव्या शिक्षण धोरणाच्या मान्यतेनंतर अंमलबजावणी

सध्या या योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करून नव्या शिक्षण धोरणाअंतर्गत ही योजना राबवली जाऊ शके ल, असे डॉ. पटवर्धन यांनी सांगितले.