पुणे : विद्यापीठांच्या अंतिम वर्ष परीक्षा घेण्याच्या निर्णयानंतर आता या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न स्वरुपाच्या, ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांकडून या पद्धतीला विरोध दर्शवण्यात येत आहे. आतापर्यंतच्या परीक्षा दीघरेत्तरी स्वरुपाच्या झाल्या असून, आता कमी कालावधीत बहुपर्यायी प्रश्न स्वरुपाच्या प्रश्नांसाठी तयारी कशी करायची असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य शासनाने १ ते ३१ ऑक्टोबरच्या दरम्यान परीक्षा घेऊन निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता विद्यापीठांनी परीक्षा घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू के ली आहे. मात्र, बहुपर्यायी स्वरुपाची, ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

आतापर्यंतच्या परीक्षा दीघरेत्तरी स्वरुपाच्या असल्याने आता अचानक बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षेची तयारी कशी करायची, हा पर्याय होता तर महिने का वाया घालवले असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारले जात आहेत. जेईई, नीटच्या विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नपत्रिके चे स्वरूप आधीपासून माहीत असते. त्यामुळे बहुपर्यायी स्वरुपामुळे अंतिम वर्षांचे विद्यार्थी अडचणीत येणार आहेत. एका तासाच्या कालावधीत आकडेमोड, गणिते कशी करायची हा प्रश्न आहे. या पद्धतीने निकालावरही परिणाम होऊ शकतो, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार परीक्षा घेणे आवश्यक. करोना संसर्गाची स्थिती, साधनसुविधांची उपलब्धता लक्षात घेऊन अत्यंत कमी कालावधीत, सुरक्षितरीत्या परीक्षा होणे आवश्यक आहे. बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांचा मुद्दा रास्त असला तरी त्यांना जितके  शिकवलेले आहे, आकलन झाले आहे याचा अंदाज घेऊनच विषय शिक्षक प्रश्नपत्रिका तयार करतील. विद्यार्थी केंद्रित अशाच प्रश्नपत्रिका असतील. त्या दृष्टीने काठिण्यपातळीची, विद्यार्थ्यांची अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.

– डॉ. एन. एस. उमराणी, प्र कु लगुरू, सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ

विद्यापीठात नवीन पदविका, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

पुणे : संरक्षणशास्त्र, व्यवस्थापन, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक सुरक्षा, सामाजिक शास्त्र अशा शाखांतील नवे अभ्यासक्रम सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाने सुरू के ले आहेत. या पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होणार असून १५ सप्टेंबपर्यंत अर्ज सादर करता येतील. विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने परिपत्रकाद्वारे नव्या अभ्यासक्रमांची माहिती दिली आहे. यातील अनेक अभ्यासक्रम विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातील संरक्षण आणि सामरिक शास्त्र ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागातील आहेत. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये  इंटिग्रेटेड कोर्स इन डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, ग्लोबल सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजीक स्टडीज, आंबेडकर थॉट्स इन नॅशनल सिक्युरिटी, पब्लिक अँड सोशल पॉलिसी, एमबीए एक्झिक्युटिव्ह यांचा समावेश आहे. तर, पदविकांमध्ये केमिकल, बायलॉजिकल, रेडिएशन, न्यूक्लीअर अँड नॅशनल सिक्युरिटी, युरोपियन पीस अँड सिक्युरिटी, आफ्रिकन पीस अँड सिक्युरिटी, मिडल ईस्ट अँड  साउथ एशियन सिक्युरिटी,  सायबर अँड  इंडियाज नॅशनल सिक्युरिटी हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमांची अधिक माहिती, प्रवेश प्रक्रियेचा तपशील http://www.unipune.ac.in या संके तस्थळावर देण्यात आल्याचे शैक्षणिक प्रवेश विभागाने नमूद केले.