जानेवारीपासून विभागातील ४५ रुग्णांना जीवदान

पुणे : एका बाजूला पुणे शहरातील आरोग्य यंत्रणा करोना विषाणू संसर्गाशी दोन हात करण्यात गुंतलेल्या आहेत. त्याचवेळी मेंदू मृत रुग्णांचे निरोगी अवयव गरजू रुग्णांना मिळावेत आणि त्यांचे जगणे सुकर व्हावे याबाबतही रुग्णालयांकडून प्रयत्न होत आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून करोना काळातील १० वे अवयव प्रत्यारोपण रविवारी यशस्वी करण्यात आले आहे.

४१ वर्षीय महिला मेंदूतील अंतर्गत रक्तस्त्रावानंतर उपचारांसाठी जहांगिर रुग्णालयात दाखल झाली. मात्र, उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे डॉक्टरांनी तिला मेंदूमृत घोषित केले. दरम्यान महिलेचा पती आणि इतर कु टुंबीयांनी तिचे अवयव दान करण्याची तयारी दर्शवल्यामुळे मुंबईतील गरजू रुग्णासाठी महिलेचे हृदय रवाना करण्यात आले. पुणे आणि मुंबईतील वाहतूक पोलिसांनी ‘ग्रीन कॉरिडॉर’ के ल्यामुळे हे हृदय योग्य वेळी गरजू रुग्णापर्यंत पोहोचवणे शक्य झाले. यकृताचे प्रत्यारोपण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णावर करण्यात आले. पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या आरती गोखले यांनी याबाबत माहिती दिली.

परगावच्या रुग्णांनाही अवयव

पुणे विभागातून दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैद्राबाद येथील गरजू रुग्णांसाठीही निरोगी अवयव पाठवण्यात आले. दोनपैकी एक हृदय दिल्लीतील फोर्टिस तर दुसरे हृदय चेन्नईतील एमजीएम रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. फु प्फु से हैद्राबादमधील रुग्णासाठी पाठवण्यात आली. मुंबई येथील विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीकडे एक मूत्रपिंड, फु प्फु से आणि एक हृदय सुपूर्द करण्यात आले.

अवयव प्रत्यारोपण – जानेवारी ते आतापर्यंत

दरम्यान १ जानेवारी २०२० ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीत पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीतर्फे  २४ मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान यशस्वी करण्यात आले. या रुग्णांकडून समितीकडे २७ मूत्रपिंडे, २४ यकृत, तीन हृदय, २ फु प्फु से तर तीन स्वादुपिंडे उपलब्ध झाली. त्यांपैकी १९ मूत्रपिंडे, २२ यकृत, एक मूत्रपिंड-यकृत आणि तीन मूत्रपिंड-स्वादुपिंड यांचे एकत्रित प्रत्यारोपण पुणे विभागातील रुग्णांवर करण्यात आले. चार मूत्रपिंड आणि एका यकृताचा वापर वैद्यकीय कारणांमुळे करणे शक्य झाले नाही.