News Flash

Valentine’s Day 2020 : अंध सुनिता-सचिन यांची अशी फुलली प्रेमकहाणी

प्रेम हे आंधळ असतं, पण ते डोळस असल्यासारख करायचं असतं...

प्रेम हे आंधळं असतं अस अनेकदा ऐकलं असेल. पण, ते अंध व्यक्तींच्या बाबतीत मात्र डोळस असतं. पिंपरी-चिंचवडमधील सचिन व सुनिता पिसाळ हे अंध दाम्पत्यं पाच वर्षांपासून सुखाने संसार करत आहेत. त्यांचा प्रेम विवाह झालेला आहे. अगदी चित्रपटातील कथानकास शोभेल अशी त्यांची अनोखी प्रेम कहाणी आहे.

एकदा सुनिता एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या, त्या ठिकाणी सचिन अनेक मुलांसमोर ‘सांगा मी काय करू’ हे गीत गात होते. डोळ्यांनी दिसत नसतानाही केवळ सचिन यांच्या आवाजावरून सुनिता त्यांच्या आवाजाबरोबच त्यांच्याही प्रेमात पडल्या. मात्र, प्रेमात अडथळे असतातच याचा प्रत्यय त्यांना देखील आला. त्यांच्या प्रेमाला सचिन यांच्या घरच्या व्यक्तींचा सुरुवातीस विरोध होता. मात्र, या दोघांनीही सर्व अडथळे पार करत प्रेमविवाह केला. अखेर पाच वर्षांपासून ते आज सुखाने संसार करत आहेत.

सचिन यांच्या प्रेमात पडलेल्या सुनिता यांनी थेट त्यांच्या घरी माझं सचिन यांच्यावर प्रेम असल्याचं सांगितलं. परंतु, सचिन यांच्या घरचे लग्नासाठी तयार नव्हते. दोघेही अंध असल्याने संसार कसा करणार? हा प्रश्न घरातील मंडळींसमोर होता. त्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला होता. मात्र, सुनिता यांनी फोन करून लग्न तुमच्याशी करायचं आहे असं सचिन यांना सांगितले. तेव्हा सचिन यांनी एका व्यक्तीला मध्यस्थी करत लग्न पार पाडले.

लग्न झाल्यानंतरही त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. नवीन संसार असल्याने त्यांना पैश्यांची कमतरता भासत होती. त्यांना स्वतः चा व्यवसाय करायचा होता. एका दिल्लीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून एक लाख रुपये देत कागदी प्लेट तयार करण्याचा व्यवसाय करण्यासाठी मशीन मागवली. त्याने मशीन पाठवले खरे मात्र ते चालले नाही. यामुळे सचिन आणि सुनिता यांची मोठी फसवणूक झाली. या धक्क्यामुळे दोघेही निराश झाले होते. परंतु, त्यांनी स्वतःला सावरत एकमेकांच्या सहकार्याने संसार उभा केला. आता सुनिता एका ठिकाणी काम करतात तर सचिन हे भक्तीगीत सादर करून व बॅटरी विकून आपला संसाराचा गाडा हाकत आहेत. दोघेही स्वाभिमानाने जगत आहेत.

प्रेम हे आंधळ असतं, पण ते डोळस असल्या सारख करायचं असतं. केवळ शारीरिक आकर्षण नकोय, त्या प्रेमाला काही अर्थ राहात नाही. असे प्रेम जास्त दिवस टिकतही नाही. असं सचिन सांगतात. मन जुळल्याने आजपर्यंत आमचं प्रेम टिकून आहे. आमच्यात भांडण होतात. मात्र, तात्पुरती असतात, प्रेमात एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. शारीरिक आकर्षणाला बेगडी प्रेम म्हणतात. असं प्रेम जास्त दिवस टिकत नाही असे ही ते म्हणाले. पण, काहीही असो प्रेम हे दिसण्यावर नसते. तर, अंतर्भावातून खरच समोरचा व्यक्ती आपल्यावर प्रेम करतोय का? आयुष्यभर सांभाळेल का याचा विचार करण्याची गरज सध्या तरी नक्कीच आहे. असंही त्यांनी यावेळी सांगितलं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 10:14 am

Web Title: such a blossoming love story of blind sunita sachin msr 87 kjp 91
टॅग : Valentine Day
Next Stories
1 बारामती, शिरूर तालुक्यात बिबटय़ा जेरबंद
2 एक्स्प्रेसमध्ये जागेवरून झालेल्या वादात कल्याणमधील तरुण ठार
3 त्रुटींमुळे ‘बीआरटी’चा बोऱ्या
Just Now!
X