News Flash

प्रेमभंगातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

राहुलला एका चांगल्या कंपनीत नोकरी होती

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रेमभंग झाल्याने एका २७ वर्षीय तरुणाने आपली जीवन यात्रा संपवली आहे. आज दुपारी २:३० च्या सुमारास ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली आहे. राहुल असे आत्महत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमभंग झाल्याने राहुल या तरुणाने आपल्या राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत राहुलच्या मोबाईल वर प्रेयसीचे ६५ मेसेज मिळाले आहेत. यामध्ये तू माझ्याशी संबंध ठेऊ नकोस, मला बोलू नकोस असे तिने म्हटले आहे. राहुलची आत्महत्या ही प्रेमभंगातूनच झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

राहुल हा मूळचा मनमाडचा आहे. पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या त्याच्या भावाकडे नोकरीसाठी डिसेंबर महिन्यात राहुल हा आला होता. त्याला एका नामांकित कंपनीत नोकरी देखील लागली होती. आज दुपारी २:३० वाजता घरातील राहुलचा भाऊ आणि त्याची वहिनी हे किराणा आणण्यासाठी बाहेर गेले होते तेव्हा राहुल ने घरातील दरवाजाला आत मधून लॉक करून बेडरूम मध्ये जाऊन ओढणीच्या साहाय्याने आत्महत्या केली. राहुलचा भाऊ परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.  राहुलचे प्रेम प्रकरण हे घरामध्ये माहित होते. त्याला या प्रकरणात पडू नकोस असा सल्ला देखील घरच्यांनी दिला होता. अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 6:49 pm

Web Title: suicide in pimpri chinchwad manmad nashik district man commits suicide
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडमध्ये बस-दुचाकीची समोरासमोर धडक; तरुण ठार
2 गजेंद्र चौहान गच्छंतीप्रकरणी गोंधळच!
3 ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’च्या वार्षिकांकाचे उद्या प्रकाशन
Just Now!
X