19 January 2021

News Flash

बारामतीमधील शिक्षकाचा कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न

बारामतीतील एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या एका शिक्षकाने पत्नी व सतरा वर्षांची मुलगी यांच्या सोबत विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत हा शिक्षक व त्याच्या

| June 22, 2013 06:30 am

बारामतीतील एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या एका शिक्षकाने पत्नी व सतरा वर्षांची मुलगी यांच्या सोबत विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत हा शिक्षक व त्याच्या मुलीचा मृत्यू झाला असून पत्नीची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांना घटनास्थळी चिठ्ठी मिळाली असून त्यात ‘नोकरी लावण्यासाठी काही शिक्षक व नागरिकांकडून पैसे घेऊन एका व्यक्तीला दिले. मात्र, त्या व्यक्तीने नोकरी न लावल्यामुळे सर्वजण यांना पैसे मागत आहेत. यामुळे नैराश्य आल्याने आत्महत्या करत आहे,’ असे म्हटले आहे.
हनुमंत काशीनाथ म्हसवडकर (वय ५२), मुलगी संध्याराणी म्हसवडकर (वय १७, रा, दोघे सूर्यनगरी, बारामती एमआयडीसी) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत, तर म्हसवडकर यांच्या पत्नी लतादेवी (वय ४८) यांच्यावर उपचार सुरू आहेत. म्हसवडकर हे दौंड येथील ज्योती प्रसाद विद्यालयात शिक्षक होते. याबाबत पोलीस निरीक्षक एस. बी. चव्हाण यांनी सांगितले की, म्हसवडकर हे एक वर्षांपासून बारामती एमआयडीसी परिसरात पत्नी व मुलीसह राहात होते. त्यांचा मुलगा शिकण्यासाठी बाहेर असतो. ते मूळचे माळशिरस तालुक्यातील राहणारे आहेत.
म्हसवडकर यांनी गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता मुलाला आणि भाचाला फोन करून सकाळी सहा वाजता भेटण्यास बोलविले. त्यानंतर त्यांनी कप आणि ग्लास यातून विष घेऊन मुलगी, पत्नीसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाच्याने सकाळी त्यांना फोन केला. परंतु, तो न उचलल्यामुळे म्हसवडकर यांचा मुलगा आणि भाचा घरी आले. तेव्हा त्यांना हा प्रकार दिसून आला. लतादेवी यांची जराशी हालचाल दिसल्याने त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता त्यांना घटनस्थळी कप, ग्लास आढळून आले. त्याच बरोबर ‘सुसाईड नोट’ मिळाली आहे. त्यामध्ये त्यांनी नोकरी लावण्यासाठी नातेवाईक व इतरांकडून पैसे एका व्यक्तीला दिले. पण, त्याने नोकरी न लावल्यामुळे हे सर्वजण पैसे मागत आहेत. त्यामुळे नैराश्य आले असल्याने आत्महत्या करत आहे, असे त्यात म्हटले आहे. या प्रकरणी म्हसवडकर यांनी पैसे दिलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2013 6:30 am

Web Title: suicide try in baramati from teacher with family
Next Stories
1 कॉल ड्रॉप अन् लादलेले प्लॅन; मोबाईल कंपन्यांचा लुटीचा धंदा
2 कार्यालयात जाताना तुरळक पाऊस, घरी परतताना धो-धो पाऊस!
3 घाऊक विक्रेते व एफडीएच्या खडाजंगीत छोटय़ा किरकोळ औषध विक्रेत्यांचे हाल
Just Now!
X