News Flash

जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सुमती टिकेकर यांचे निधन

संस्कृत आणि मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका सुमती टिकेकर यांचे पुण्यात रविवारी निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या.

| October 12, 2014 07:00 am

संस्कृत आणि मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका सुमती टिकेकर यांचे पुण्यात रविवारी निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. अभिनेते उदय टिकेकर यांच्या आई व आरती अंकलीकर टिकेकर यांच्या त्या सासूबाई होत्या. सुमती टिकेकर या जयपूर घराण्याच्या शास्त्रात्य गायिका होत्या. बालगंधर्वांची नाटय़पदे गाण्यामध्ये त्यांची ख्याती होती. नाटय़संगीतामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. ‘संगीत वरदान’, ‘संगीत मान-अपमान’,‘संगीत शारदा’, ‘संगीत सौभद्र’ यासह अनेक गाजलेल्या संगीत नाटकात त्यांनी भूमिका बजावल्या. अनामिक नाद उठे गगनी, आठवणी दाटतात, श्रीरामाचे दर्शन घडले ही त्यांची विशेष गीते आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 7:00 am

Web Title: sumati tikekar passed away
Next Stories
1 एकच छंद जोपासणे अवघड – नाना पाटेकर
2 मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर
3 बेटिंगच्या अ‍ॅपवरून तीन बुकींनी कमविला सव्वाकोटी रुपयांचा नफा
Just Now!
X