23 September 2020

News Flash

बँक ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी सुशील मुनोत

बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून शनिवारी सुशील मुनोत यांनी पदभार स्वीकारला.

| November 10, 2013 02:44 am

बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून शनिवारी सुशील मुनोत यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी मुनोत हे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट बँक ऑफ इंडिया (एमआयडीबीआय) मध्ये अध्यक्ष व व्यवस्थापकीय म्हणून कार्यरत होते.
सुशील मुनोत यांनी बी.ई. टेक्स्ट (टेक), एमबीए, सीएआयआयबी आणि पर्यावरण यात मास्टर पदवी प्राप्त केली आहे. त्यांना बँकिंग आणि भारतातील औद्योगिक विभागाचा वित्तीय विषयांचा व्यापक अनुभव असून त्यांच्या ३४ वर्षांच्या अनुभवात ते दोन वर्षे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट बँक ऑफ इंडिया मध्ये अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी ते आयडीबीआय लिमीटेडचे कार्यकारी संचालक होते. तसेच, त्यांनी विविध बँका व वित्तीय प्रकल्पांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2013 2:44 am

Web Title: sushil munot is the new chairman and managerial director of bank of maharashtra
Next Stories
1 रंगभूमीवर माझी भूमिका शबरीची – रतन थिय्याम
2 शेक्सपिअरच्या नाटकांचे होणार तीन देशांत प्रयोग
3 सीओईपी अभिमत विद्यापीठ होणार?
Just Now!
X