News Flash

शिवसेना, भाजपा अन् हिंदुत्व… सुशीलकुमार शिंदेंनी मांडलं रोखठोक मत

भाजपाच्या हिंदुत्वाला शिवसेनेनं चांगला धडा शिकवला असल्याचंही म्हणाले आहेत.

संग्रहीत

“शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्वाला मुरड घातली असे मला तरी वाटत नाही. कारण, किमान समान कार्यक्रम हा प्रबोधन ठाकरे यांनी वेगळ्या रुपाने आधी मांडला होता. त्याला आता उद्धव ठाकरेंनी चांगली साथ देत भाजपाला सत्तेपासून त्यांनी दूर ठेवले आहे. भाजपाच्या हिंदुत्वाला शिवसेनेनं चांगला धडा शिकवला आहे.” अशा शब्दांत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या, प्रबोधन शतक महोत्सव आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाप्रसंगी सुशीलकुमार शिंदे हे बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “शिवसेना आज ज्या किमान समान कार्यक्रमनुसार सत्तेत आली, तेच हिंदुत्व प्रबोधनकारांना अपेक्षित होते आणि तेच खरे हिंदुत्व आहे ” असं त्यांनी सांगितले.

तसेच, “राज्यात शिवसेना २० वर्षानंतर सत्तेत आली असून, खरंतर हेच २५ वर्षे आधी व्हायला हवे होते. त्यामुळे आता पुढे जाऊ या.. ” असे आवाहन देखील या कार्यक्रमाच्या माध्यामातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांनी यावेळी केले. पुणे हे राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचा अड्डा आहे आणि त्या पुण्यात आज प्रबोधनकारांची आणि शिवसेना प्रमुखांची जयंती साजरी होत आहे. ही मोठी ऐतिहासिक घटना असल्याचेही सुशीलकुमार शिंदेंनी बोलून दाखवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 8:01 pm

Web Title: sushilkumar shinde targeted bjp on the issue of hindutva msr 87 svk 88
Next Stories
1 “उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे”
2 मुंबईची हवा दिल्लीप्रमाणे अतिवाईट
3 एक शून्य शून्य आता ‘शून्य’!
Just Now!
X