News Flash

हिंजवडीमध्ये नवविवाहित दाम्पत्याचा गूढ मृत्यू

हिंजवडीतील साखरे वस्ती भागामध्ये नवविवाहित दाम्पत्य बुधवारी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.

| July 24, 2013 03:14 am

हिंजवडीतील साखरे वस्ती भागामध्ये नवविवाहित दाम्पत्य बुधवारी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. दाम्पत्यापैकी नवऱयाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा संशय असून, पत्नीच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. 
मोहन आणि नयना चौधरी असे या दाम्पत्याचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेले हे दोघेही साखरे वस्ती भागामध्ये राहात होते. मोहनने घरातच गळफास लावून घेतल्याचे त्याचा भाऊ आत्माराम चौधरी याने बुधवारी सकाळी पाहिले. तिथेच जवळ नयना यांच्याही मृतदेह पडल्याचे त्यांना दिसले. पोलिसांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदनानंतरच दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. मोहन हिंजवडी परिसरात किराणा व्यवसायिक होता होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 3:14 am

Web Title: suspicious death of newly married couple in pune
Next Stories
1 आळंदीच्या नवीन पुलावरून इंद्रायणी नदीत मोटार पडली – चार ते पाच व्यक्ती वाहून गेल्याची भीती
2 लोहयुक्त गोळ्यांची खरेदी भलत्याच कंपनीकडून?
3 आयुक्तांची माफी मागेपर्यंत अधिकाऱ्यांचा बहिष्कार कायम
Just Now!
X