मिडास, तेजल क्रिएशन्स आणि बासरी फाउंडेशनतर्फे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना सांगीतिक मानवंदना देण्यासाठी रविवारी (२४ मे) स्वर-प्रभा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात पं. कुमार गंधर्व यांच्या कन्या कलापिनी कोमकली आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांचे गायन होणार आहे. त्यांना सुयोग कुंडलकर संवादिनीची तर, भरत कामत आणि संजय देशपांडे तबल्याची संगत करणार आहेत. या कार्यक्रमाला डॉ. प्रभा अत्रे यांच्यासह नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात उपस्थित राहणार असल्याची माहिती तेजल क्रिएशन्सच्या ललिता मराठे आणि बासरी फाउंडेशनच्या संस्थापिका आरती कुंडलकर यांनी दिली.