उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे महामेट्रोचे नियोजन
पुणे : स्वारगेट येथील प्रस्तावित बहुउद्देशीय वाहतूक केंद्राबरोबरच स्वारगेट बसस्थानकात प्रवाशांना सहज जाता यावे, यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून भुयारी मार्ग करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाच्या बाजूने स्वारगेटकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे कठडे तोडण्याचे काम सुरू झाले आहे. या कामानिमित्ताने उड्डाणपुलावरील आणि उड्डाणपुलाखाली जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिके अंतर्गत स्वारगेट परिसरात बहुउद्देशीय वाहतूक के ंद्र उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या हे काम प्रगतिपथावर आहे. पीएमपी, बसस्थानक, मेट्रोबरोबरच खासगी प्रवासी वाहतुकीच्या साधनांचा विचार करून बहुउद्देशीय वाहतूक के ंद्राची उभारणी होत आहे. या वाहतूक के ंद्रातून पीएमपी, स्वारगेट बसस्थानकाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग प्रस्तावित आहे. भुयारी मार्गाचे काम महामेट्रोकडून सुरू करण्यात आले असून त्यासाठी उड्डाणपूल ज्या ठिकाणी उतरतो त्या ठिकाणचे कठडे तोडण्यात येणार आहेत. लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाच्या बाजूकडील स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाचे कठडे तोडण्यात येत आहेत, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. या कामासाठी महापालिके कडूनही परवानगी मिळाली असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिके कडून चार वर्षांपूर्वी जेधे चौकातून सातारा रस्त्याकडे जाण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या उड्डाणपुलाच्या एका बाजूला स्वारगेट बसस्थानक तर दुसऱ्या बाजूला बहुउद्देशीय वाहतूक के ंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या वाहतूक के ंद्र आणि स्वारगेट स्थानकाला भुयारी मार्गाने जोडण्याचे नियोजित आहे.
फु गेवाडी ते सँडविक कं पनी ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी बंद
मेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरात वेगाने काम सुरू आहे. मेट्रोचे काम अधिक वेगात करण्यासाठी फु गेवाडी मेट्रो स्थानक ते सँडविक कं पनी येथील ग्रेड सेपरेटर रस्ता (जुना मुंबई-पुणे रस्ता) १० सप्टेंबपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ आणि रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीमध्ये वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे महामेट्रोकडून कळविण्यात आले आहे. या कालावधीत बीआरटी मार्गही बंद राहणार असून वाहनचालकांनी सेवा रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2020 12:49 am