News Flash

विहिंपच्या शोभायात्रेसंबंधीचे गुन्हे मागे घ्या अन्यथा मोर्चा काढू – कुलकर्णी

विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेत मुलींकडील बंदुका या प्रतिकात्मक होत्या, त्यामुळे आर्म ऍक्ट लागू होत नाही.

पिंपरी-चिंचवड : विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेसंबंधी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अन्यथा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा विहिंपचे विवेक कुलकर्णी यांनी दिला आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेत मुलींकडील बंदुका या प्रतिकात्मक होत्या, त्यामुळे आर्म ऍक्ट लागू होत नाही. पदाधिकाऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत तसेच दोन पोलीस अधिकाऱ्यांवर सक्तीची कारवाई करावी, अन्यथा पुढील आठवड्यात हजारोंच्या संख्येने पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला जाईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

कुलकर्णी म्हणाले, पोलिसांनी दिलेल्या सूचना आम्ही मान्य केल्या होत्या. विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गावाहिनीकडून सात दिवसांच्या वर्गामध्ये प्रतिकात्मक शस्त्रांचे प्रशिक्षण दिले गेले. अंकुश चौक ते ठाकरे मैदान यमुनानगर येथील शोभा यात्रेसाठी पोलीस प्रशासनाने निगडी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार आणि गुन्हे पोलीस निरीक्षक निकाळजे सोबत दिले, सोबत पोलिसांचा ताफा ही दिला होता. त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत वाद केला. दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला मुलींकडे खऱ्या बंदुका असून त्या हवेत गोळीबार करत जात असल्याचे सांगितले. मात्र ती प्रतिकात्मक शस्त्रे असल्याचे आम्ही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. एअर रायफलवर कुठल्या अॅक्टनुसार गुन्हा दाखल होत नाही. काही अघटीत घडले असते तर त्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली असती का? असा सवाल विवेक कुलकर्णी यांनी उपस्थित केला.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने संबंधित गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. या घटनेकडे गांभीर्याने पाहून दोन पोलीस अधिकाऱ्यांवर सक्तीची कारवाई करावी. जर, हे घडलं नाही तर पुढील आठवड्यात हजारोंच्या संख्येने पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, त्यानंतर पुढील घटनांना पोलीस प्रशासन जबाबदार असेल असा थेट इशाराही यावेळी कुलकर्णी यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 5:32 pm

Web Title: take back crime against vhps office bearer otherwise thousands people march will take place on cp office
Next Stories
1 राज ठाकरे यांनी घेतली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट
2 पुण्यात अंगातील भूत पळवण्यासाठी सुनेला मारहाण; गुंगीचे औषध देऊन काढला व्हिडिओ
3 पाटील इस्टेट झोपडपट्टीत पुन्हा आग; सहा घरं खाक
Just Now!
X