जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

पुणे : करोनाच्या दोन लशींच्या मिश्र मात्रा घेण्याच्या परिणामांबाबत अद्याप संशोधन सुरू आहे. त्या संशोधनाचे अहवाल प्राप्त झालेले नसल्याने हातात असलेली माहिती अत्यंत त्रोटक आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या लशींची मिश्र मात्रा घेणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत प्रत्येक देशाने लसीकरणाबाबत स्वीकारलेले धोरण हे संपूर्ण संशोधनांवर आधारित आहे. त्यामुळे स्थानिक आरोग्य आणि कु टुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून लसीकरणाबाबत वैयक्तिक निर्णय घेऊ नयेत, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी के ले आहे. भारतासह अनेक देशांमध्ये सध्या दोन वेगवेगळ्या लशींच्या मिश्र मात्रेच्या परिणामांबाबत चर्चा होत आहेत. मिश्र लशींच्या मात्रेबाबत अद्याप संशोधन सुरू आहे. त्यामुळे अशा मात्रा घेणे फायद्याचे ठरेल की जोखमीचे याबाबत कोणतेही शास्त्रीय निष्कर्ष समोर आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी परस्पर लस घेण्याबाबत निर्णय घेऊ नये, असे आवाहन डॉ. स्वामिनाथन यांनी के ले आहे.

डॉ. स्वामिनाथन यांनी ट्विटर द्वारेही मिश्र लस मात्रेबाबत आपली भूमिका स्पष्ट के ली आहे. लशीची मिश्र मात्रा ही कदाचित अभिनव कल्पना ठरेल, मात्र संशोधनाअंती हाती येणाऱ्या निष्कर्षांशिवाय त्याबाबत निर्णय घेणे योग्य नाही. नागरिकांनी देशाच्या के ंद्रीय आरोग्य आणि कु टुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून लस घेणे योग्य ठरेल. दोन मात्रा पूर्ण झाल्यानंतर तिसरी किं वा चौथी मात्रा घेण्याबाबत नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर निर्णय घेऊ नये, असेही डॉ. स्वामिनाथन यांनी स्पष्ट के ले आहे.