News Flash

तालेरा रुग्णालयातील झाडांची तोड

चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाच्या आवारातील जुनी झाडे रविवारी, सुट्टीच्या दिवशी तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

| January 28, 2015 02:58 am

तालेरा रुग्णालयातील झाडांची तोड

चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाच्या आवारातील जुनी झाडे रविवारी, सुट्टीच्या दिवशी तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रकरण अंगावर शेकण्याची चिन्हे दिसताच पालिकेच्या परवानगीनेच ही तोड झाली असून फक्त निर्धारित संख्येपेक्षा जास्त झाडे तोडली गेल्याची सारवासारव करण्यात येत आहे.

चिंचवडच्या तालेरा रुग्णालयाच्या आवारातील झाडांच्या वाढलेल्या फांद्या तोडण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाने उद्यान विभागाकडे केली. त्यानुसार, कंत्राटदाराला ते काम देण्यात आले. रविवारी सुट्टीच्या दिवशी येऊन त्याने बेसुमार झाडे तोडली. फक्त फांद्या छाटण्याचे काम असताना मोठी व जुनी झाडे तोडली. त्यावेळी रुग्णालयाचा कोणीही अधिकारी हजर नव्हता. सोमवारी हा प्रकार लक्षात आला. उद्यान अधीक्षकांनी अहवाल मागावून घेतला आहे. या संदर्भात, कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2015 2:58 am

Web Title: talera hospital tree cut down
Next Stories
1 आर. के. लक्ष्मण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, राज्य सरकार स्मारक उभारणार
2 ‘जातींच्या आधारे समाजामध्ये फूट पाडण्याचे कारस्थान’
3 ‘फेसबुक’द्वारे जाळ्यात ओढून व्यापाऱ्याच्या भावाचे अपहरण
Just Now!
X