पुण्यातील शिवाजीनगर कामगार पुतळा येथील पुलावर ट्रक मुठा नदीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथून पुणे स्टेशनकडे निघालेला ट्रक (एमएच ४२ टी ७३१२) कामगार पुतळा येथील पुलावरून नदीत कोसळला. ट्रक पुलाच्या मध्यभागी असतानाच हा अपघात झाला. पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढला जात आहे.