भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेनंतरही टँकरद्वारे पाण्यासाठी सव्वा कोटींच्या निविदा

पुणे : भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेतून शहराच्या पूर्व भागाला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाही महापालिके ने या भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा खर्च करण्याची तयारी सुरू के ली आहे. त्यासाठी प्रत्येकी २४ लाख रुपयांच्या पाच स्वतंत्र निविदा प्रक्रिया महापालिके ने राबविल्या आहे. हा सर्व खटाटोप स्थानिक टँकर माफियांसाठी करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

चंदननगर, वडगांवशेरी, कल्याणीनगर, खराडी, विश्रांतवाडी, कळस, लोहगांव, धानोरी, विमाननगर या शहराच्या पूर्व भागाला होत असलेला विस्कळीत पाणीपुरवठा लक्षात घेऊन महापालिके ने भामा-आसखेड धरणातून या भागाला पाणीपुरवठा करण्याची योजना कार्यान्वित के ली आहे. या योजनेचे उद्घाटनही झाले असून सध्या तांत्रिक चाचणी महापालिका प्रशासनाकडून घेतली जात आहे. या योजनेमुळे पूर्व भागाचा पाणीप्रश्न निकाली निघाला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाकडून के ला जात असून पुढील महिन्यापर्यंत या भागाला योजनेचे पाणी मिळणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

ही योजना कार्यान्वित होण्यापूर्वी पूर्व भागाला बहुतांश वेळा टँकरद्वारे पाणीपुरवठा के ला जात होता. या परिस्थितीमध्ये सद्य:स्थितीमध्ये कोणताही फरक पडलेला नाही.  या भागाला प्रत्येक दिवशी किमान  ७५ ते कमाल १२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेमुळे टँकरची संख्या घटणार असून तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत अवघ्या काही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, असे महापालिके च्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर के ले आहे.

ही परिस्थिती असतानाही महापालिके च्या पाणीपुरवठा विभागाने प्रत्येकी २४ लाखांच्या पाच निविदा काढल्या आहेत. ही रक्कम सुमारे सव्वा कोटींची आहे. भविष्यात पूर्व भागाचा पाणीपुरवठा खंडीत होऊ नये आणि उन्हाळ्याच्या पार्श्वभूमी वर सर्व भागाला पाणी पुरवठा व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने के ला आहे. वास्तविक टँकर माफियांसाठीच या सर्व पायघड्या घातल्या जात असल्याचे दिसून येत आहे. या भागात टँकरमाफियांची मोठी टोळी सक्रिय आहे. अनेक राजकीय नेत्यांचे टँकर आहेत, ही वस्तुस्थिती आहे. एका बाजूला भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेमुळे टँकरची गरज भासणार नाही, असे महापालिकाच सांगत असताना आणि एप्रिल महिन्यापर्यंत घराघरात योजनेचे पाणी पोहोचणार असताना पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र खर्च करण्याची गरज का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

पाण्याचा काळाबाजार

महापालिके च्या जलकेंद्रातून टँकर भरले जातात. मात्र या टँकरची कोणतीही नोंद जलकेंद्रात ठेवली जात नाही, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. आसपासच्या परिसरातील बांधकामांना, शैक्षिणक संस्थांच्या वसतिगृहांना पाणी विकले जाते, ही वस्तुस्थिती आहे. टँकरला बसविण्यात आलेली जीपीआरएस प्रणालीही के वळ नावालाचा असून जलकेंद्रातील सीसीटीव्ही कॅ मेरे नादुरुस्त आहेत. त्याबाबत सातत्याने तक्रारी केल्या आहेत.

भविष्यात पाणीप्रश्न निर्माण झाल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सध्या काही भागाला पाणीप्रश्न भेडसावित आहे. दक्षता म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

– रमेश वाघमारे,कार्यकारी अभियंता