पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि शासन मान्यताप्राप्त अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातील अंतिम सत्र, वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या परीक्षा होतील.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी गुरुवारी वेळापत्रक जाहीर केले. एआयसीटीई संलग्न पदविका, औषधनिर्माण अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते २५ सप्टेंबर, बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर,

थिअरी परीक्षा ५ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होईल. अल्पमुदत अभ्यासक्रमातील अंतिम वर्ष,  बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते २५ सप्टेंबर, नियमित आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांची थिअरी परीक्षा २५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होईल. निकाल ३१ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे. डॉ. मोहितकर यांनी जाहीर के लेल्या वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षांच्या परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाच्या ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांना घरी राहूनच देता येतील. परीक्षेत विद्यार्थ्यांना ४० पैकी ३० प्रश्न सोडवावे लागतील. क रोना कालावधीपर्यंत विद्यार्थ्यांचा ९० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांचे १०० टक्क्यांमध्ये रूपांतर करण्यात येईल. घरी राहून परीक्षा देता न येणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळच्या तंत्रनिके तनमध्ये परीक्षा देण्याची सुविधा दिली जाईल. अपरिहार्य कारणास्तव परीक्षाच देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन प्रणालीद्वारे मौखिक पद्धतीने संस्थास्तरावर घ्यावी. सर्व प्रयत्नांनंतरही विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेणे शक्य नसल्यास सत्रातील काम, प्रयोगवही, निरंतर मूल्यमापनाद्वारे गुण द्यावेत, असे मोहितकर यांनी स्पष्ट केले.