News Flash

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना २६ नवे अभ्यासक्रम शिकण्याची संधी

‘एआयसीटीई’तर्फे  संकेतस्थळ विकसित

(संग्रहित छायाचित्र)

 

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी नवे अभ्यासक्रम डिजिटल पद्धतीने शिकण्याची संधी निर्माण झाली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ‘ईएलआयएस’ हे ऑनलाइन संके तस्थळ निर्माण के ले असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम विनामूल्य शिकता येतील.

संचारबंदीमुळे महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद करण्यात आली आहे.  मात्र, या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी हे संके तस्थळ विकसित करण्यात आले आहे.

या संके तस्थळावर देशभरातील शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास १८ कंपन्यांचे २६ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमात पाठय़पुस्तकातील ज्ञानासह कौशल्यावरही भर देण्यात आला आहे. पाच ते २० हजार रुपये शुल्क असलेले हे अभ्यासक्रम संचारबंदीमुळे विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य करण्यात आले आहेत.

या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना १५ मेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. एआयसीटीईच्या या संकेतस्थळावर अभ्यासक्रमांची माहिती आणि नोंदणी प्रक्रिया देण्यात आली आहे, असे एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 1:11 am

Web Title: technical education students have the opportunity to learn 26 new courses abn 97
Next Stories
1 Coronavirus : शहरासह जिल्ह्यातील करोनाच्या सद्य:स्थितीचा अहवाल राज्य सरकारकडे
2 पीएमपीच्या गाडय़ांमध्ये निर्जंतुकीकरण यंत्रणा
3 यंदा सरासरीइतका पाऊस!
Just Now!
X