News Flash

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड

पूर्वकल्पना न देता पाणीपुरवठा बंद; दक्षिण पुण्याला फटका

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड
पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्यामुळे सहकारनगर परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी विस्कळीत झाला. पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून रहावे लागले.

पूर्वकल्पना न देता पाणीपुरवठा बंद; दक्षिण पुण्याला फटका

पुणे : महापालिके च्या पर्वती जलकेंद्रात बिघाड झाल्यामुळे दक्षिण पुणे परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. शिवदर्शन, लक्ष्मीनगर, तावरे कॉलनी, अरण्येश्वर, पद्मावती, सहकारनगर, चव्हाणनगर, तळजाई, बिबवेवाडी, मार्के टयार्डसह महर्षीनगर परिसरातील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. बिघाड झाल्यानंतर कोणतीही पूर्वकल्पना न देता या भागाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी के ला आहे.

खडकवासला धरणातून पर्वती जलकेंद्रात बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यात येते. या जलकेंद्रात पाण्यावर प्रक्रिया के ली जाते. त्यानंतर त्या-त्या भागातील पाणीपुरवठय़ासाठी या जलकेंद्रातून पाणी साठवणूक टाक्यात सोडले जाते. त्यामुळे पर्वती जलकेंद्र हे पाणीपुरवठय़ाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. शहराचा बहुतांश भागातील पाणीपुरवठा पर्वती जलकेंद्रावरच अवलंबून आहे.

पर्वती जलकेंद्रात गुरुवारी पहाटे दोन वाजता तांत्रिक बिघाड झाला.

महावितरणद्वारे जलकेंद्राला विद्युत पुरवठा करणारी एक वाहिनी नादुरुस्त झाली. त्यामुळे शिवदर्शन, लक्ष्मीनगर, तावरे कॉलनी, अरण्येश्वर, पद्मावती, सहकारनगर, चव्हाणनगर, तळजाई, बिबवेवाडी, मार्के टयार्डसह महर्षीनगर या भागाला त्याचा मोठा फटका बसला. महापालिके च्या पाणीपुरवठा विभागाकडे यासंदर्भात नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या. पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वाहिनी दुरुस्तीचे काम तब्बल अठरा तास सुरू होते. त्यामुळे गुरुवारी दिवसभर या भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही.  विद्युत पुरवठा करणारी २२ के व्हीची के बल बिघडल्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्याची माहिती महापालिके च्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

दरम्यान, पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे स्थानिक नगरसेवकांकडे नागरिकांकडून विचारणा सुरू झाली. महापालिके चा निष्क्रिय कारभार या गैरसोयीला कारणीभूत आहे, असा आरोप नगरसेवकांकडून करण्यात आला.

‘स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरातील पाणीपुरवठय़ाची परिस्थिती किती विदारक आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. शहरातील सर्व जलकेद्रांमध्ये महावितरणच्या स्वतंत्र वाहिन्या असणे अपेक्षित आहे. महापालिका आयुक्तांनी याप्रकरणात लक्ष घालावे. पुणेकरांना आकस्मिक संकटाला सामोरे जावे लागू नये याची दक्षात घ्यावी,’ असे काँग्रेस गटनेता आणि नगरसेवक आबा बागुल यांनी सांगितले. समान पाणीपुरवठाच्या नावाखाली महापालिके ने कर्ज घेतले आहे. त्यानंतरही नागरिकांवर अशी वेळ येत आहे. दुरुस्तीसाठी १८ तास कालावधीत लागला. कोणतीही पूर्वकल्पना न देता या भागाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. करोना संकटाच्या काळात पाण्याची आवश्यकता असताना नागरिकांचे पाण्याअभावी मोठे हाल झाले, असा आरोप नगरसेविका अश्विनी कदम यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 2:48 am

Web Title: technical problem in parvati water treatment plant zws 70
Next Stories
1 युवकाला गंडा ; ऑनलाइन दुचाकी दुरुस्ती महागात
2 मुदत संपलेले वाहन चालन  परवाने ३० सप्टेंबपर्यंत ग्राह्य
3 रात्रशाळांतील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित
Just Now!
X