तंत्रस्नेही नागरिकांची शक्कल; इतर नागरिक मात्र प्रतीक्षेतच 

भक्ती बिसुरे, लोकसत्ता

पुणे : लसीकरण नावनोंदणी आणि वेळनिश्चितीसाठी बंधनकारक असलेल्या को-विन संकेतस्थळावर ‘स्लॉट’ मिळवणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. मात्र, काही तंत्रस्नेही नागरिक को-विन संकेतस्थळाचे प्रारूप (बॉट्स) तयार करून त्याद्वारे लसीकरणासाठी झटपट ‘स्लॉट’ मिळवीत आहेत.

कोविन संके तस्थळावर नावनोंदणी आणि वेळ निश्चित के ल्याशिवाय लसीकरण करण्यात येत नाही; परंतु को-विन संके तस्थळावर नावनोंदणीचा प्रयत्न के ल्यानंतर त्वरित सर्व ‘स्लॉट’ भरून जात असल्याचा अनुभव सर्वच घेत आहेत. परंतु को-विनचे प्रारूप तयार करून त्याद्वारे लसीकरणाची वेळ घेण्याच्या प्रकारांमध्ये काही दिवसांपासूून वाढ झाली आहे.

बॉट्सकसे काम करतात?

तंत्रज्ञानतज्ज्ञ अनिके त मुंदडा म्हणाले की, सरकारी संकेतस्थळावर ‘अ‍ॅप्लिके शन प्रोग्रामिंग इंटरफे स’ची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे प्रारूप (बॉट्स) तयार करणे ही एखाद्या अभियंत्यासाठी अगदी साधी गोष्ट आहे. को-विन संके तस्थळावरील माहिती घेऊन कोणत्या भागात कोणत्या वेळी लसीकरण ‘स्लॉट’ उघडणार हे ठरावीक समाजमाध्यमांतून आपल्यापर्यंत पोहोचवले जाते. ‘बॉट्स’मध्ये भ्रमणध्वनी क्रमांक आणि ओटीपी ही माहिती भरल्यानंतर आपल्या नजीकच्या लसीकरण के ंद्रांवर उघडणारे स्लॉट आरक्षित करण्याचे काम यांत्रिकपणे

जिल्हा, हवा असलेला दिवस, वेळ, केंद्र असे प्राधान्यक्रम बॉट्समध्ये नोंदवले जातात. स्लॉट उघडल्यानंतर बोट्सद्वारे क्षणार्धात ते आरक्षित होतात. त्यामुळे इतर नागरिकांनी को-विन संकेतस्थळावर स्लॉट भरायला घेतल्यास ते वेळेआधीच भरलेले दिसतात.

तंत्रज्ञान अडथळा ठरू नये!

लसीकरण नावनोंदणी झटपट होण्यासाठी ‘बॉट्स’ तयार झाले आहेत. मात्र, तंत्रस्नेही असणे हा लस मिळवण्याचा निकष ठरता कामा नये. लसीकरण सर्वसामान्यांसाठी होण्याची गरज आहे. त्यासाठी के ंद्रावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. लसीकरण प्रक्रियेला तंत्रज्ञान पूरक ठरावे, मात्र अडथळा ठरू नये, असे ‘पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्सचे’ प्रमुख सुधीर मेहता यांनी स्पष्ट केले.

प्रारूपाद्वारे दोन दिवसांत वेळ

माहिती तंत्रज्ञान अभियंता अन्वय देशपांडे यांनी आपला अनुभव कथन केला. ते म्हणाले की, १८ ते ४४ वयोगटासाठी लस मिळणार हे समजल्यानंतर को-विन संके तस्थळावर नावनोंदणीसाठी प्रयत्न के ले. कोणत्याही वेळी प्रयत्न

के ला तरी सर्व ‘स्लॉट’ भरलेलेच दिसत होते. हा अनुभव आठवडाभर घेत होतो. परंतु ‘बॉट्स’ची माहिती मिळताच त्याद्वारे प्रयत्न केला. दोन दिवसांत मला जवळच्या लसीकरण केंद्रावरील ‘स्लॉट’ उपलब्ध झाला.