News Flash

टेलिमेडिसिन व्यासपीठ आता भारतात

भारतीय डॉक्टरही नाव नोंदणी करू शकणार आहेत

टेलिमेडिसिन व्यासपीठ आता भारतात

पुणे : जगभरातील फिजिशियन डॉक्टरांची एकत्रित नोंद ठेवून टेलिमेडिसिन सेवेसाठी उपलब्ध करून देणारे ग्लोबल टेलिहेल्थ एक्सचेंज नेटवर्क  आता भारतात सुरू होत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत डॉक्टरांच्या माहितीची काटेकोर पडताळणी करून ती या व्यासपीठावर प्रसिद्ध करण्यात येते. त्यामध्ये आता भारतीय डॉक्टरही नाव नोंदणी करू शकणार आहेत.  त्यामुळे आपला वैद्यकीय सेवेतील अनुभव, ओळखपत्र, उपलब्धता, दरपत्रक या माहितीसह नावनोंदणी करून जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्व ठिकाणच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा देणे डॉक्टरांना शक्य होणार आहे.

मोबाइल अ‍ॅप्लिके शन स्वरुपात ही सेवा उपलब्ध असल्याने रुग्णांच्या वैद्यकीय नोंदी, वैयक्तिक माहिती यांची मालकी आणि नियंत्रण रुग्णाकडे राहणार आहे. त्यामुळे माहितीची गोपनीयता राखली जाण्याची चिंता रुग्णांना करावी लागणार नाही. तसेच, दरवेळी डॉक्टरांची भेट घेताना कराव्या लागणाऱ्या तपासण्या, त्यांवर खर्च होणारा वेळ आणि पैसे यांची बचत होणार आहे.

या अ‍ॅपवर नोंदणी के लेले डॉक्टर, त्यांचा अनुभव आणि माहिती सर्व रुग्णांना उपलब्ध राहणार असून रुग्ण थेट या डॉक्टरांची वेळ घेऊन उपचारांसाठी संपर्क  साधू शकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2021 1:19 am

Web Title: telemedicine platform now in india akp 94
Next Stories
1 महिलांसाठीची फिरती स्वच्छतागृहे वापराविना
2 फुकटचे बादशहा
3 गणेशोत्सवात रस्त्यावरील  वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाला घोर
Just Now!
X