19 September 2020

News Flash

पुण्यात दहा वर्षांच्या मुलाची आत्महत्या

धनकवडी परिसरातील तानाजीनगरमध्ये राहणाऱया सुनिल पिसाळ यांच्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलाने रविवारी रात्री राहत्या घरी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

| December 22, 2014 01:08 am

धनकवडी परिसरातील तानाजीनगरमध्ये राहणाऱया सुनिल पिसाळ यांच्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलाने रविवारी रात्री राहत्या घरी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. आदित्य असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. सोमवारी सकाळी आदित्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनिल पिसाळ हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या बहिणीचा काल वाढदिवस होता. त्यामुळे पिसाळ यांच्या घरातील सर्वजण जेवणासाठी हॉटेलमध्ये जात होते. त्यावेळी आदित्य याने नवीन जर्किन घेण्याचा हट्ट केला. जर्किन घेतले तरच मी बाहेर येर्इन, असेही तो म्हणाला. त्याच्या आर्इने स्वेटर घेऊ असे त्याला सांगितले. मात्र, त्याने जर्किनच घेण्याचा हट्ट लावून धरला. त्यामुळे त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर घरातील सर्वजण हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. आदित्य घरी एकटाच होता. त्याने रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आदित्य हा एकुलता एक मुलगा होता. तो इयत्ता पाचवीमध्ये शिकत होता. त्याला एक मोठी बहिण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 1:08 am

Web Title: ten year boy commits suicide in pune
Next Stories
1 पुण्यातील सार्वजनिक वाहतूक इथेनॉलवर चालवा- गडकरी
2 केंद्राच्या रस्ते वाहतूक विधेयकाच्या विरोधात देशव्यापी बंदचा निर्णय
3 १५ नगरसेवकांचे पिंपरी पालिकेत ठिय्या आंदोलन
Just Now!
X