News Flash

दहावीची परीक्षा ‘अधिकृतरीत्या’ रद्द

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द केल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते.

(परीक्षार्थी विद्यार्थी - प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे :  राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या घोषणेनंतर बावीस दिवसांनी परीक्षा रद्द के ल्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने बुधवारी प्रसिद्ध के ला आहे. त्यामुळे आता दहावीच्या परीक्षा ‘अधिकृतरित्या’ रद्द झाल्या आहेत. दहावीची परीक्षा रद्द के ल्यामुळे गुणपत्रक/प्रमाणपत्र देण्याबाबत, अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत स्वतंत्रपणे निर्देश देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द केल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर के ले होते. मात्र त्यानंतर या निर्णयाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला नव्हता. त्यामुळे काही तांत्रिक अडचणीही निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 12:13 am

Web Title: tenth exam canceled officially akp 94
Next Stories
1 अक्षय्य तृतीयेसाठी आंबा बाजार बहरला!
2 पुणे : “रमजान ईद घरीच साजरी करा”; मनपा आयुक्तांचे आवाहन!
3 पुण्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा सर्रासपणे गैरवापर! ६३९ कोविड रुग्णालयांच्या ऑडिटचे निष्कर्ष!
Just Now!
X