28 September 2020

News Flash

मावळ लोकसभेच्या रिंगणात बसपाकडून टेक्सास गायकवाड प्रतिनिधी, पिंपरी

मावळ लोकसभेच्या रिंगणात बहुजन समाज पार्टीने आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते टेक्सास गायकवाड यांना उतरवले आहे.

| March 24, 2014 02:55 am

वेगवेगळ्या नाटय़मय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या मावळ लोकसभेच्या रिंगणात बहुजन समाज पार्टीने आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते टेक्सास गायकवाड यांना उतरवले आहे. त्यामुळे मावळातील लढत आणखी रंगतदार होणार आहे.
मावळात महायुतीचे श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर, मनसे व शेकापच्या पािठब्यावर लक्ष्मण जगताप, ‘आप’कडून मारूती भापकर यांची उमेदवारी निश्चित आहे, त्यात टेक्सास यांच्या उमेदवारीची भर पडली आहे. याबाबतची घोषणा रविवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. मायावती यांना देशाच्या पंतप्रधान करण्यासाठी टेक्सास गायकवाड यांच्यासारख्या सक्षम कार्यकर्त्यांला निवडून देण्याचे आवाहन बसपाने केले. ज्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत केले, त्याचा दलित जनता सूड घेईल आणि महायुतीला रोखण्याचे कामही करू. मावळ लोकसभेतील उमेदवार जाती-पातीचे, गावकी-भावकीचे राजकारण करत असून पैशाचा पाऊस पाडणार आहेत. आजपर्यंत ज्यांना निवडून दिले, त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत. आम्ही कदापि खोटी आश्वासने देणार नाही, असा युक्तिवाद बसपाने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2014 2:55 am

Web Title: texas gaikwad from bsp in maval constituency
Next Stories
1 आजार बरा करण्याची प्रक्रिया आतून सुरू व्हावी – डॉ. ह. वि. सरदेसाई
2 हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव करावा – शरद पवार
3 उमेदवार निश्चित; पण भाजपकडून घोषणा नाही
Just Now!
X