खासगी रुग्णालयांमध्ये थेट येणाऱ्यांसाठी २० टक्के  लस

पुणे : शहरातील सर्व प्रमुख खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी कोविन संके तस्थळावरील नाव नोंदणीची अट सोमवारपासून शिथिल करण्यात आली. त्यामुळे थेट येणाऱ्या नागरिकांनाही सशुल्क लस उपलब्ध होणार आहे. शासकीय आणि महापालिका रुग्णालयांमध्ये मोफत लशीसाठी ४५ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य दिले जाणार असून २० टक्के  लशी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना देण्यात येणार आहेत.

देशातील करोना प्रतिबंधक लसीकरणाची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी कोविन संके तस्थळावरील नोंदणीची अट नुकतीच केंद्र शासनाने शिथिल के ली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वासाठी मोफत लशीची घोषणाही के ली. त्या पाश्र्वभूमीवर शहरातील खासगी रुग्णालयांनी कोविन संके तस्थळावर नोंदणी करून येणाऱ्या आणि थेट येणाऱ्या नागरिकांसाठी लसीकरण उपलब्ध के ले आहे.

पूना हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी नरेश दवे म्हणाले,की नोंदणी करून येणारे आणि थेट येणारे नागरिक यांचे एकाच व्यवस्थेतून लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण अधिकाधिक वेगवान होण्यासाठी आणि गर्दी, गैरसोय टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

संजीवन रुग्णालयाचे डॉ. मुकुंद पेनूरकर म्हणाले, की अद्याप कोविनवर नोंदणी करुन येणारे नागरिक आहेत. पुढील काही दिवस त्यांचा ओघ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोंदणी करून येणारे आणि थेट येणारे या दोन्ही गटांना लस दिली जाणार आहे. केंद्र शासनाने नोंदणीची अट शिथिल के ल्यानंतर दोन्ही गटांचे सुरळीत लसीकरण करण्याचे नियोजन के ले असून त्याची अंमलबजावणी सुरू के ल्याचे शहरातील प्रमुख खासगी रुग्णालयांकडून सांगण्यात आले आहे.

१५१ केंद्रांवर आज लसीकरण

शहरातील १५१ के ंद्रांवर मंगळवारी करोना प्रतिबंधक लसीकरण होणार आहे. २४ मे आणि त्यापूर्वी कोव्हॅक्सिन लशीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांना १५ केंद्रांवर प्राधान्याने लस दिली जाणार आहे. आरोग्य सेवक आणि इतर आघाडीच्या कर्मचाऱ्यांना १५ केंद्रांवर कोव्हिशिल्ड लशीची पहिली मात्रा दिली जाणार आहे. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी १५१ केंद्रांवर कोव्हिशिल्ड लशीची पहिली तसेच दुसरी मात्रा दिली जाणार आहे.