करोना विषाणूच्या महामारीमुळे शाळा, महाविद्यालय जवळपास मागील आठ महिन्यापासून बंद आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थीचा अभ्यास ऑनलाइनच्या माध्यमातुन सुरू आहे. पण त्याच दरम्यान पुण्यातील हडपसर भागातील इयत्ता सहावीमध्ये शिकणार्‍या मुलीस आईने अभ्यास कर म्हणून सांगितले. त्याचा राग आल्याने मुलीने घर सोडून निघून गेली. मात्र पोलिसांनी काही तासात मुलीला शोधण्यात यश आले आहे.

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील मांजरी परिसरात इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेणारी मुलगी असून ती आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही काही न सांगत बाहेर पडली. ती बराच वेळ कुठे ही दिसत नाही. म्हणून घरातील लोकांनी आसपास चौकशी केली असता, तिचा काही शोध लागला नाही. तसेच तिच्या जवळ असलेला मोबाइल देखील स्विच ऑफ येत होता.

त्यामुळे मुलीच्या आईने तातडीने आमच्याकडे तक्रार दिली असता. आम्ही मोबाइलच्या लोकेशननुसार शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तिचे लोकेशन सतत बदलत राहत होते. त्यामुळे काही अडचणी आल्या, अखेर आम्हाला कात्रज येथे सापडली. ती तिथे काही नागरिकांशी बोलत होती. ती ज्या नागरिकांशी संवाद साधत होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते म्हणाले की, ती राहण्यासाठी खोलीची चौकशी करीत आहे. त्यावर तिला विचारले की, तू घर सोडून का गेलीस, त्यावर ती म्हटली की, आई मला सतत अभ्यास कर म्हणत असत. त्याचा मला राग आल्याने घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. त्यानंतर आम्ही तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले असून घरातील व्यक्तींचे देखील समुपदेशन केले असल्याचे त्यांनी सांगितले.