News Flash

झाडाची फांदी डोक्यावर पडून महिलेचा मृत्यू

प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या बैठकीस लावली होती हजेरी

प्रतिनिधिक छायाचित्र

पुण्यातील आपटे रस्त्यावर एका महिलेच्या डोक्यावर झाडाची फांदी पडून तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तपास डेक्कन पोलिस करीत आहे.

जयश्री चंद्रकांत जगताप ( वय ४८, रा. कोथरूड) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, घोले रोडवरील सांस्कृतिक हॉल येथे प्रहार अपंग क्रांती संघटनेची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी संघटनेचे पदाधिकारी आले होते. या बैठकीसाठी कोथरूड भागातील ( दिव्यांग) जयश्री जगताप या देखील आल्या होत्या. या बैठकी दरम्यान जयश्री जगताप या त्यांच्या सहकार्‍यांसह चहा घेण्यासाठी आपटे रोडवरील महापौर बंगल्याच्या मागील बाजूस गेल्या आणि आंब्याच्या झाडा खाली थांबल्या थांबल्या होत्या. मात्र याचवेळी त्यांच्या डोक्यावर झाडाची फांदी पडली. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले असता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 10:00 pm

Web Title: the death of a woman falls on the head of the tree branch msr87
Next Stories
1 पंतप्रधान पीक विमा योजनेच्या कार्यशाळेत गोंधळ
2 दुचाकी पाडल्याचा जाब विचारल्याने चावा घेत पाडला कानाचा तुकडा
3 पुणे पोलिसांनाच हव्यात पुणेरी पाट्या, असतील तर इथे पाठवा
Just Now!
X