News Flash

हिंजवडीत इमारतीच्या १६व्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

आत्महत्या की आजारपणामुळे चक्कर येऊन पडला हे अद्याप अस्पष्ट

प्रातिनिधिक छायाचित्र

हिंजवडीमधील ‘ब्ल्यूरिच’ या वसाहतीत राहात असलेल्या हॉटेल कर्मचाऱ्याचा १६ व्या मजल्यावरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. महेंद्रसिंह बोरा असे या तरुणाच नाव आहे. तो याच वसाहतीत असलेल्या ‘मदर्स किचन’ नावाच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंह बोरा (वय १९, रा. ब्ल्यूरिच वसाहत, मूळगाव उत्तरांचल) याचा आज दुपारी राहत्या इमारतीच्या १६ व्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला आहे. तो याच वसाहतीत असलेल्या ‘मदर्स किचन’ नावाच्या हॉटेलमध्ये गेल्या चार दिवसांपासून वेटर म्हणून काम करीत होता. या अगोदर त्याचा भाऊ याच ठिकाणी काम करीत होता.

महेंद्रसिंहने बालेवाडीतील याच हॉटेलच्या शाखेत एक महिना काम केले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तो आजारी होता आणि त्याला चक्कर देखील येत होती, अशी माहिती त्याच्या सहकार्याने दिली. विशेष म्हणजे तो खोलीत एकटाच होता, त्यामुळे इमारतीच्या १६व्या मजल्यावरून चक्कर येऊन पडला की त्याने आत्महत्या केली, हे गूढ आहे. अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2018 10:25 pm

Web Title: the death of the youth due to falling from the 16th floor of hinjewadi building
Next Stories
1 केंद्रीय अर्थसंकल्प छाप सोडू शकलेला नाही; उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी व्यक्त केली नाराजी
2 हातावर सुसाईड नोट लिहून बारामतीतील युवकाची आत्महत्या
3 डिजिटायझेशनमुळे शासकीय योजनेतून दलाल हद्दपार – फडणवीस
Just Now!
X