29 September 2020

News Flash

दातांच्या शस्त्रक्रियेदरम्यान अतिरक्तस्त्रावाने तरुणीचा मृत्यू

डॉक्टर दाम्पत्याविरोधात नातेवाईकांची तक्रार दाखल; रुग्णालय प्रशासनाने केले हात वर

पिंपरी-चिंचवड: दातांच्या शस्त्रक्रीयेदरम्यान अतिरक्तस्त्रावाने धनश्री जाधव या तरूणीचा मृत्यू झाला

पिंपरी-चिंचवडमध्ये दातांची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा अतिरक्तस्त्राव होऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी डॉक्टर दाम्पत्यावर निष्काळजीपणा केल्याचा तरुणीच्या नातेवाईकांनी आरोप केला असून, त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

धनश्री जाधव (वय-२३) असे मृत तरुणीचे नाव आहे. स्टर्लिंग आयुर्वेदीक रुग्णालयात ही घटना घडली आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने हात वर केले असून, संबंधित डॉक्टर दाम्पत्याचा आणि रुग्णालयाचा काही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर निष्काळजीपणाचा आरोप असलेल्या डॉ. पाटील दाम्पत्याने चौकशीसाठी सहकार्य करू अशी भूमिका घेतली आहे.

गेल्या काही वर्षांपासून धनश्री त्यांच्याकडे उपचार घेत होती. २४ एप्रिल रोजी तिच्या दातांवर डॉ.पाटील दाम्पत्याने शस्त्रक्रिया केली होती. परंतु, शस्त्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. ती कोमात देखील गेल्याचे सांगण्यात येत असून, तिला त्याच वेळी अर्धांगवायूचा झटका देखील आल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या मेंदूमध्ये रक्त पुरवठा होत नव्हता. अखेर शनिवारी ४ मे रोजी तब्बल ११ दिवसांनी सकाळी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिच्या पालकांनी निगडी पोलिसात डॉ.पाटील दाम्पत्या विरोधात तक्रार दिली आहे. मृत धनश्रीच्या बहिणीचा पुढील महिन्यात विवाह आहे.

धनश्रीच्या दातांची शस्त्रक्रिया ही ऑक्टोबर महिन्यात होणार होती. शस्त्रक्रियेची तयारी झाली आणि ऐनवेळी भूल देण्याअगोदर धनश्रीला औषधांची रिअॅक्शन झाल्याने तिला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले होते. त्यामुळे तिची तेव्हांची शस्त्रक्रिया मागील आठवड्यात पार पडली. मात्र, यानंतर तिचा अतिरक्तस्त्राव होऊन अखेरीस मृत्यू झाला. शवविच्छेदनाच्या अहवालात काही संशयास्पद आढळल्यास संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे निगडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निकाळजे यांनी सांगितले आहे.तर स्टर्लिंग आयुर्वेदीक रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर धर्मेश गांधी यांनी डॉ.पाटील दाम्पत्य हे आउटसोर्स युनिट ऑफ डेंटल विभागाचे असून त्यांचा आणि रुग्णालयाचा काही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

“दुर्दैवी घटना आहे, शक्यतो अस घडत नाही. मोठी शस्त्रक्रिया होती, सर्वतोपरी काळजी घेतली होती. जाधव कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी असून पुढे चालून होण्याऱ्या चौकशीसाठी सहकार्य करेल. माझ्याकडून हलगर्जी पणा झालेला नाही.” – डॉ. राम पाटील, आरोप असलेले डॉक्टर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 7:58 pm

Web Title: the death of woman during dental surgery
Next Stories
1 Video : पिंपरी-चिंचवडमध्ये गप्पा मारत थांबलेल्या दोघांवर टोळक्यांचा सशस्त्र हल्ला
2 पुण्यात उकाडा पुन्हा वाढणार
3 निवडणूक काळात सी-व्हिजिल अ‍ॅपवर बाराशे तक्रारी दाखल
Just Now!
X