News Flash

बायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले

पोलिसांनी साहिलचे वडिल राजू सुनारवर खुनाचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक करण्यात आली

बायको घर सोडून गेल्यान आठ महिन्यांच्या मुलाला चिमुकल्याला पाण्याच्या टाकीत फेकून बापाने ठार केले. चाकणच्या नाणेकरवाडी या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. सहिल सुनार असं या आठ महिन्यांच्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी साहिलचे वडिल राजू सुनारवर खुनाचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

चक्र उर्फ राजू सुरत सुनार आणि त्याची पत्नी निर्मला सुनार दोन मुलांसह गुरुवारी प्रवीण झुंजार यांच्या इमारतीतील भाड्याच्या खोलीत राहण्यास आले होते. याआधी ते कुरळी आणि भोसरीमध्ये राहण्यास होते. दोन वर्षांची मुलगी आणि आठ महिन्यांचा साहिल असा त्यांचे कुटुंब आहे. रात्री उशिरा राजू आणि त्याची पत्नी यांच्यात भांडण झालं. भांडण झाल्यामुळे शुक्रवारी सकाळी पत्नी निर्मला दोन्ही मुलांना घरी ठेवून घर सोडून गेली. याचा राग अनावर झाल्याने राजूने त्याच्या आठ महिन्याच्या चिमुकल्याला बाथरुमजवळच्या पाण्याच्या टाकीत फेकले आणि त्याची हत्या केली.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. आरोपी राजू आळंदी फाट्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो.
विशेष म्हणजे पत्नी निर्मला अनेक वेळा घर सोडून गेलेली आहे.परंतु पती पत्नीच्या भांडणात आठ महिन्याच्या चिमुकल्याने जीव गमावला तर दोन वर्षांची चिमुकली उघड्यावर आली आहे.तिचा सांभाळ करण्याची वेळ चाकण पोलिसांवर आली आहे.आरोपीला चाकण पोलिसांनी अटक केलेली आहे.या घटनेचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 6:36 pm

Web Title: the father threw his eight month old child in the well after the wife left the house
Next Stories
1 पाणी येत नसल्याची तक्रार केल्याने भाजपा नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून कुटुंबास मारहाण
2 ‘चोर तर चोर पोलिसांवर शिरजोर!’, पोलीस अधिकाऱ्यासाठी मनसेचा पुण्यात मोर्चा
3 PHOTO: साताऱ्यातील तरुणाईमध्ये नवीन राजांचा ‘उदय’
Just Now!
X