बोरघाटातून मुंबई पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल आज (रविवार) तोडण्यात आला. सध्या करोनामुळे असलेल्या लाॅकडाउन व प्रवासबंदीमुळे वाहतूक रोडावल्याचे निमित्त साधत हे काम करण्यात आले. द्रुतगती मार्ग झाल्यानंतरही अमृतांजन पूलाच्या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होती. हा द्रुतगती मार्ग जरी झाला असला तरी या पुलाजवळील काही प्रवासी पट्टा जुन्या महामार्गाला व द्रुतगती मार्गाला सामाईक आहे त्यामुळेच येथे कायम वाहतूक कोंडी होत असते. यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून पर्यायी मार्ग व उड्डाण पुलांचे काम सुरू आहे. दरम्यान जीर्ण झालेला व अडचणीचा ठरत असलेला हा ऐतिहासिक पूल आज  पाडण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे  पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावरील हा १९० वर्षे जुना अमृतांजन पूल आता  इतिहास जमा झाला आहे. आज सायंकाळच्या सुमारास हा पूल पाडण्यात आला तेव्हा त्या ठिकाणी काही प्रशासनातील महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. अनेक दिवसांपासून हा पूल पडायचा होता. परंतु, द्रुतगतिमार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते, त्यामुळे ते शक्य होत नव्हते. मात्र, सध्या करोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतमार्गावरील वाहतुक कमी आहे. त्यामुळे हा सर्वात जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्यात आला. १० नोव्हेंबर १८३० साली अमृतांजन पूल बांधण्यात आला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The historic amritjan bridge collapsed on the mumbai pune highway msr 87 kjp
First published on: 05-04-2020 at 20:16 IST