पुणे : कोंढवा येथील लुल्लानगर भागात घरासमोर वाहने लावण्याच्या वादातून संगणक अभियंत्याची लोखंडी रॉडने आणि दगडाने ठेचून तिघांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या माहितीनुसार, कोंढवा येथील लुल्लानगर भागात नेवल भोमी बत्तीवाला हा संगणक अभियंता राहत होता. त्याच्या घरासमोर नेहमी ट्रॅव्हल्सची वाहने लावली जात होती. यापूर्वी देखील नेवलच्या घरासमोर वाहने लावण्यावरून वादाचे प्रकार घडले होते. त्याचीच पुनरावृत्ती शुक्रवारी रात्री देखील झाली. या दरम्यान नेवलने वाहने लावू नका, असे संबंधीतांना पुन्हा एकदा सांगितले. मात्र, त्यावेळी तिथे असलेल्या वाहन मालकाने मी आरटीओचा अधिकारी असल्याचे सांगत नेवलला धमकावण्याचा प्रयत्न केला.

मात्र, नेवलने त्याच्याकडे ओळखपत्र मागितल्याने संतापलेल्या वाहन मालकाने आम्हाला ओळखपत्र मागणारा तू कोण असे विचारत तिघांच्या मदतीने नेवलला लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण केली. या मारहाणीमध्ये नेवल गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The killing of a computer engineer in a dispute between the cars in front of the house in pune
First published on: 20-01-2018 at 15:51 IST