04 March 2021

News Flash

शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखाची हत्या करणारा मुख्य आरोपी अटकेत

आरोपीच्या साथीदाराला देखील पोलिसांनी अटक केली आहे

लोणावळा शहरात शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राहुल उमेश शेट्टी यांची पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि कुऱ्हाडीने घाव घालून भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अवघ्या २४ तासांच्या आत पिस्तुलातून गोळ्या आणि कुऱ्हाडीने घाव घालणाऱ्या आरोपीला लोणावळा पोलीस आणि पुणे ग्रामीण गुन्हे शाखा यांनी अटक केली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून इतर दोघांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी न्यायलायने सुनावली आहे. इब्राहिम युसूफ खान असं मुख्य गोळ्या झाडणाऱ्या आणि कुऱ्हाडीने घाव घालणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्यासोबत हजर असलेल्या मोहन देवबहादूर ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर सूरज अगरवाल आणि दिपाली भिल्लारे यांना सोमवारीच अटक करण्यात आली होती. लोणावळा शहरातील जयचंद चौकात सोमवारी भरदिवसा सकाळच्या सुमारास यातील आरोपी इब्राहिम ने शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राहुल उमेश शेट्टी यांची पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून आणि कुऱ्हाडीने मानेवर घाव घालून हत्या केली होती. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनेनंतर आरोपींनी पळ काढला  होता. या प्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या २४ तासांच्या आत चार आरोपींना लोणावळा पोलिसांनी अटक केले आहे. दरम्यान, मयत राहुल उमेश शेट्टी यांच्यावर अगोदर दोन हल्ले झाले होते अस ही पोलिसांनी सांगितले असून अद्याप या हत्येचे कारण अस्पष्ट असून पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा प्रथमदर्शी संशय असल्याचे पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे. लोणावळा शहर हे दोन खुनाच्या घटनांनी हादरले होते, त्यानुसार पोलिसांनी गांभीर्याने तपास करत अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 9:05 pm

Web Title: the main accused in the murder of former shiv sena city chief has been arrested in lonavala scj 81 kjp 91
Next Stories
1 पुण्यात करोनामुळे २२ मृत्यू, पिंपरीत आढळले १४४ नवे रुग्ण
2 उसतोड कामगारांना मजुरीत सरासरी १४ टक्के वाढ
3 मी काही लेचापेचा नाही, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना टोला
Just Now!
X