29 September 2020

News Flash

मराठा क्रांती सेनेचा स्वबळावर १०० जागा लढवण्याचा निर्धार

भाजप - शिवसेना युतीत सहभागी झाल्यास १० जागांवर लढणार

(संग्रहित छायाचित्र)

आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर १०० जागा लढवण्याचा निर्धार मराठा क्रांती सेनेच्यावतीने करण्यात आला आहे. पुण्यात पार पडलेल्या मराठा समन्वयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा क्रांती सेनेने भाजप – शिवसेना युतीकडे १० जागांची मागणी केली असून समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर १०० जागा लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

एकूण ४२ संघटनांनी मराठा क्रांती सेनेला पाठिंबा दर्शवला असल्याचा दावाही करण्यात आला आहे. आंदोलनातून तयार झालेलं मराठा समाजाचं नेतृत्व विधानसभेत पाठवण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. यामुळे आता आगामी काळात मराठा क्रांती सेना युती बरोबर राहते की, स्वबळावर आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरी जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 5:30 pm

Web Title: the maratha kranti sena is determined to contest 100 seats msr 87
Next Stories
1 पुणे : इंद्रायणीच्या पुरात 7 तास मृत्यूशी झूंज, घाटावरील समाधीला धरल्याने वाचला जीव
2 पावसाच्या विश्रांतीनंतर भुशी धरणाकडे जाणारा मार्ग पर्यटकांसाठी खुला
3 मनसेला आघाडीत घेण्याबाबत अद्याप निर्णय नाही-शरद पवार
Just Now!
X