News Flash

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या

फावड्याने वार करून हत्या, आरोपी फरार

लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका महिलेची फावड्याने वार करून हत्या केली आहे. शारदाबाई काकडे असे या महिलेचे नाव आहे. तिचे वय ५० वर्षे आहे असे समजले आहे. शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शारदाबाई काकडेसोबत राहणारा महेश रामजी पटेल हा फरार आहे. याप्रकरणी भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस करत आहेत.

शारदाबाई काकडे आणि महेश शांताराम पटेल हे दोघेजण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. महेश पटेल याचे स्वतःचे घर आहे. त्या ठिकाणीच दोघे राहात होते. शुक्रवारी शारदाबाईवर महेशने चारित्र्याच्या संशयावरून फावड्याने वार केले. त्यानंतर घराचा दरवाजा बंद करून महेश पळून गेला. शारदाबाईच्या चेहेऱ्यावर फावड्याने घाव घातल्यच्या जखमा आहेत. शुक्रवारपासून घरात कोणीही नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी भोसरी पोलिसांना याबाबत कळवले. त्यानंतर शनिवारी सकाळी शारदाबाईची हत्या झाल्याची घटना समोर आली. महेश पटेल फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2018 1:25 pm

Web Title: the murder of the woman who lives in the live in relationship in pimpri
Next Stories
1 सत्ता असेपर्यंत कामे करून घ्या
2 तापमान वाढल्याने राज्यात विक्रमी वीज मागणी!
3 विकासाच्या निर्णयामध्ये आमदारांना डावलले जाते
Just Now!
X