25 September 2020

News Flash

पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणारं पवना धरण ८२ टक्के भरलं

लोणावळा शहरात गेल्या २४ तासांत १९२ मीमी पावसाची नोंद

पिंपरी-चिंचवड : शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ८२ टक्के भरलं आहे.

लोणावळा शहरात गेल्या २४ तासांत १९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत ३ हजार २९९ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. जो गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा शहरासह परिसरात संततधार तर कधी दमदार पाऊस कोसळत आहे.

लोणावळा शहर हे प्रसिद्ध गिरीस्थान आणि पर्यटनस्थळ आहे. गेल्यावर्षी याचवेळी ५ हजार ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर, यावर्षी केवळ ३ हजार २९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षीच्या तुनलेत कमी असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. दरम्यान, २४ तासांत लोणावळा शहर आणि परिसरात १९२ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. यामुळे परिसरातील भातशेती करणारे शेतकरी सुखावले आहेत.

पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणारं पवना धरण ८२ टक्के भरलं

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात ८२.४२ टक्के भरले असून गेल्या २४ तासात पवना धरण पाणलोट क्षेत्रात ८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजतागायत पवना धरण हे १०० टक्के भरलेलं होतं. मात्र, यावर्षी मावळ परिसरात पाऊस कमी असल्याने धरण भरण्यास उशीर होत आहे. परंतु, असाच ऑगस्टच्या ३१ तारखेपर्यंत पाऊस सुरू राहिल्यास धरण शंभर टक्के भरेल यात काही शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 11:55 am

Web Title: the pavana dam which supplies water to pimpri chinchwad is 82 percent full aau 85 kjp 91
टॅग Rain
Next Stories
1 बारा विद्याशाखांतील अभ्यासक्रमांना ‘दूरशिक्षण’द्वारे प्रवेश नाही
2 स्वच्छ स्पर्धेत पुणे देशात १५व्या क्रमांकावर
3 ठोस उपाययोजना करण्यास वाव
Just Now!
X