20 January 2021

News Flash

पुणे पोलीस आयुक्तांनी केलेलं ते विधान चुकीचं – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य

(संग्रहित छायाचित्र)

पुणे प्रतिनिधी 

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी बद्दल शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना एक विधान केले आहे की, करोनामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यातून गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहे. असे म्हटले असून अशा प्रकाराचे विधान एखाद्या कायदा सुव्यवस्था राखणार्‍या अधिकार्‍यांने करणे चुकीचे असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. तसेच शहरातील सध्याच्या परिस्थितीवर पुणे महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना आवश्यक त्या सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे शहरात खुनाच्या आणि इतर गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. त्या प्रश्नावर अजित पवार यांनी भूमिका मांडली.यावेळी अजित पवार म्हणाले की, पुणे शहर आणि जिल्ह्यात करोना परिस्थितीवर प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. या कामात प्रशासन, डॉक्टर, पोलीस आणि पत्रकार चांगल्या प्रकारे काम करीत आहे. यामध्ये पत्रकार करोना बाबत प्रत्येक वेळी नागरिकांमध्ये प्रबोधन करीत आहे. ही कौतुकाची बाब असल्याचे सांगितले. पण मी आज प्रवासा दरम्यान पुण्यात काही ठिकाणी पाहिले. तर अद्याप ही नागरिक मास्क वापरत नाही. हे पाहून चिंता वाटत असून पोलीस विभागा मार्फत मास्कचा वापर न करणार्‍या व्यक्तीच्या कारवाईचा आढावा आज घेतला. त्यामध्ये जिल्ह्यात तब्बल ११ कोटी रुपये जमा झाले आहे. यातून एकूणच जिल्ह्याची परिस्थिती लक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 5:06 pm

Web Title: the statement made by the pune police commissioner is wrong says ajit pawar scj 81 svk 88
Next Stories
1 मराठा आरक्षणाच्या मोर्चाला वंचित आघाडीचा पाठिंबा
2 राज्यातील ४६ कारखान्यांनाच गाळप परवाने
3 संगमवाडी बीआरटी उखडा!
Just Now!
X