News Flash

स्वतःच्या मुलाला ‘गे’ म्हणून चिडवल्याने शिक्षिकेची विद्यार्थाला बेदम मारहाण

मारहाण झालेल्या विद्यार्थांचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे : शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण केल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुलाला ‘गे’ म्हणून चिडवल्याने शिक्षिकेने एका विद्यार्थाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी निगडी येथील एका प्रतिष्ठीत खासगी शाळेत घडली. हर्षल कांबळे असे मारहाण झालेल्या विद्यार्थांचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंबंधी विद्यार्थ्याच्या आईने निगडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी ही माहिती दिली.

सविस्तर माहिती अशी, निगडीतील एका प्रतिष्ठीत खासगी शाळेतील महिला शिक्षिकेचा मुलगा हा देखील त्याच शाळेत शिकत आहे. शिक्षिकेचा मुलगा आणि जखमी हर्षल हे दोघे एकाच स्कूलव्हॅनमधून इतर मुलांबरोबर शाळेत येतात. सोमवारी व्हॅनमध्ये मस्करी करीत असातना काही मुलांनी शिक्षिकेच्या मुलाला ‘गे’ म्हणून चिडवलं. त्यानंतर त्याने ही बाब आपल्या शिक्षिका आईला सांगितली.

शाळेत आल्यानंतर संबंधित शिक्षिकेने या प्रकरणी हर्षलला बोलावून घेतले आणि त्याला हातावर, गालावर, पोटात मारहाण केली, असा आरोप हर्षल आणि त्याची आई अनिता कांबळे यांनी केला आहे. तसेच मारहाण करणाऱ्या या शिक्षिकेचे निलंबन करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. सध्या हर्षलवर निगडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हर्षल कांबळे हा इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत आहे. याप्रकरणी संबंधित शाळा प्रशासनाने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 4:35 pm

Web Title: the teacher beat up to student for he said gay to her student son
Next Stories
1 राम मंदिर लवकर पूर्ण होण्यासाठी मोहन भागवतांचे दगडुशेठ हलवाई गणपतीला साकडे
2 पोलीस कोठडीतून आरोपींचं पलायन : गार्ड कमांडरचं निलंबन, 3 पोलिसांच्या चौकशीचे आदेश
3 पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी, भाजपाच्या सरपंचाविरुद्ध गुन्हा
Just Now!
X