News Flash

अनधिकृत इमारतीवर होणारी कारवाई रोखण्यासाठी महिलेची आत्महत्या

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव या ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर कारवाई होते आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवकर पार्क या भागात असलेल्या चार मजली इमारतीवर कारवाईवर सुरु करण्यात आली. त्याचवेळी या इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून या महिलेने आत्महत्या केल्याचे समजते आहे. देवीबाई राम पवार (वय ३०) असे या महिलेचे नाव आहे. या घटनेत महिलेचे दोन्ही पाय आणि एक हात जायबंदी झाला. त्यानंतर तिला उपचारांसाठी रूग्णालयात नेण्यात आले मात्र तिथेच तिची प्राणज्योत मालवली.

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप या दोघांच्या वादातून पिंपळे गुरव भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मागच्या आठवड्यात राजेंद्र जगताप यांनी पिंपळे गुरव भागातील अनधिकृत बांधकामांचे फोटो आणि व्हिडिओ सादर केले होते. तसेच ही बांधकामे भाजपशी संबंधित व्यक्तीची आहेत असाही आरोप केला होता. त्यानंतर या भागात कारवाई सुरु झाली. मात्र आपल्या इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून देवीबाई पवार या महिलेने आत्महत्या केली. या प्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 6:21 pm

Web Title: the womans suicide attempt by jumping from the fourth floor
Next Stories
1 कोरेगाव भीमातील हिंसाचार पूर्वनियोजित : रामदास आठवले
2 .. तर सेनेचे ५ पेक्षा अधिक खासदार निवडून येणार नाहीत: संजय काकडे
3 …म्हणून रुपाली पाटील यांनी केले शोले स्टाईल आंदोलन
Just Now!
X