X
X

प्रवाशांचे मोबाईल संच लंपास करणारे चोरटे गजाआड

READ IN APP

गर्दीत प्रवाशांचे मोबाईल चोरीला जात असल्याच्या तक्रारी लोहमार्ग पोलिसांकडे आल्या होत्या.

पुणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांचे मोबाईल संच लांबविणाऱ्या चोरटय़ांना लोहमार्ग पोलिसांनी पकडले. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून दोन मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.

चेतन राजू नायर (वय २२) आणि सनी संतोष ओव्हाळ (वय १९, दोघे रा. बोपोडी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरटय़ांची नावे आहेत. उन्हाळ्याच्या सुटीमुळे पुणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी होत आहे.

गर्दीत प्रवाशांचे मोबाईल चोरीला जात असल्याच्या तक्रारी लोहमार्ग पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक चोरटय़ांचा शोध घेत होते.

साध्या वेशात गस्त घालणाऱ्या पोलिसांनी नायर, ओव्हाळ आणि त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून चोरलेले दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी मोबाईल चोरीचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लुईस मकासरे, नाना मापारी, विष्णू गोसावी, राजेंद्र राऊत, प्रभा बनसोडे, उमेश बागली, अमित गवारी, विक्रम मधे यांनी ही कारवाई केली.

24
X