News Flash

पुणे – गणपती मंदिरातील दानपेटी चोरीला, घटना सीसीटीव्हीत कैद

सकाळी दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली

पुण्यातील बाजीराव रोडवरील नातूबाग मित्र मंडळाच्या गणपती मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकऱणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून खडक पोलीस स्टेशन तपास करत आहे. या चोरीचं सीसीटीव्हीदेखील समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव रोडवरील नातूबाग मित्र मंडळाचे गणपती मंदिर आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोर दुचाकीवरुन आले. यानंतर काही वेळातच त्यांनी मंदिरातील दानपेटी चोरून नेली. सकाळी दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याआधारे तपास केला जात आहे. दानपेटीत साधारणपणे दहा हजार रुपये होते अशी माहिती देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 2:20 pm

Web Title: theft in ganesh temple pune caught in cctv sgy 87
Next Stories
1 लोणावळा : पाण्याच्या भोवऱ्यातील मृतदेह काढताना पोलिसांची जीवघेणी कसरत
2 पुणे – जावयानेच घेतला सासऱ्याच्या गालाचा चावा
3 वर्गात ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक
Just Now!
X