01 March 2021

News Flash

…तर राजकारण सोडून हिमालयात जाईन-चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांचा सत्ताधारी पक्षांना टोला

संग्रहित

जे मला म्हणतात ना कोल्हापूरमधून पळून आले. ते तिथे निवडून आले नसते. मात्र मी आज मी एक चॅलेंज देतो की, कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल, जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन, अशा शब्दात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी पक्षाला टोला लगावला.

भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वर्षपूर्ती कार्यालय अहवालाचे प्रकाशन पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की मागील वर्षी विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा मला अमित शाह यांनी सांगितले की, आपको विधानसभा निवडणूक लढनीं पडेगी. अमितभाई माझा अजून विधान परिषदेचा एक महिना शिल्लक आहे मला कुठे यात अडकून ठेवता?  मी जर मोकळा राहीलो तर महाराष्ट्रभर फिरेन असं त्यांना सांगितले. आपण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचे जास्त जागा निवडून आणू, असे त्यांना सांगितले.

मात्र अमितभाईंनी आग्रह धरला तुला विधानसभा लढवायची असून आपको पुना मैं कोथरूडसे लढना है असंही सांगितलं.  तसेच मी त्यानंतर माझ्या नावाची या मतदार संघातून घोषणा झाली आणि त्यानंतर आजवर माझ्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. मला मिळालेल्या शिकवणीनुसार कोणी ही कितीही आरोप प्रत्यारोप केले तरी आपण आपले काम करीत रहायचे आणि तेच मी आजवर करीत आलो असल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच ते पुढे म्हणाले की, या विधानसभा मतदार संघाचा आमदार होऊन वर्ष झाले. या दरम्यानच्या काळात अनेक व्यक्तींनी सहकार्य केले आहे. त्या बद्दल मी सर्वांचा आभारी असून या पुढील काळात अनेक उपक्रम राबविणार आहे तसेच मतदारसंघ आणि पुणे शहराच्या समस्या सोडविण्यासाठी कायम तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 9:18 pm

Web Title: then i will leave politics and go to the himalayas says chandrkant patil scj 81 svk 88
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडमध्ये टक्कल गँगची मुळशी पॅटर्न धिंड
2 राज्यपाल भाजपाला झुकतं माप देतात का? चंद्रकांत पाटील म्हणतात…
3 पुण्यात लष्कर भरती रॅकेटचा पर्दाफाश; १९ मुलांची केली फसवणूक
Just Now!
X