24 November 2020

News Flash

ड्रग्ज प्रकरणी चार व्यक्तींना चौकशीसाठी बोलावून उपयोग नाही, त्याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज – सुप्रिया सुळे

यापूर्वीही आम्हाला नोटीसा आल्या, त्याला उत्तर देऊ - सुळे

पुणे : जिल्हा परिषद येथे माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे.

देशात सध्या अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील ड्रग्ज अॅँगलवरुन बॉलिवूड कलाकारांच्या एनसीबीकडून चौकशा सुरु आहेत. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. केवळ चार व्यक्तींना चौकशीसाठी बोलावून काही होणार नाही, तर या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायला हवं असं, सुळे यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्हा परिषद येथे एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलत होत्या.

सुळे म्हणाल्या, “मी महाविद्यालयीन जीवनापासून तंबाखू विरोधात काम करीत आहे. त्यामुळे अशा गोष्टी समाजात असूच नये, असे माझे स्पष्ट मत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आपण तंबाखू मुक्त अभियान राबवित आहोत. तसे केंद्र सरकारने ड्रग्समुक्त अभियान राबविण्याची आवश्यकता आहे.”

शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात अशा गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्याची खरी गरज आहे. या गोष्टी झाल्यास तरुण वर्ग ड्रग्ज सारख्या गोष्टींपासून दूर राहील. सध्या ड्रग्जप्रकरणी हाय प्रोफाईल तीन महिलांना चौकशीसाठी बोलावून, यामधून काहीही साध्य होणार नाही. याला मुळापासून उखडणे गरजेचे आहे, अशी भूमिकाही यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली.

यापूर्वीही आम्हाला नोटीसा आल्या…

“मला, पती सदानंद सुळे, पवार साहेबांना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना नोटीस आली आहे. या नोटिसांना आम्ही सविस्तर उत्तर देऊ. ज्या दिवशी आम्हाला ही नोटीस आली त्याच दिवशी वर्षभरापूर्वीही एक नोटीस आली होती. जे संबध महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे काम केले आहे आम्ही आमचे काम करू,” असे सुळे यावेळी म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 3:21 pm

Web Title: there is no point in calling four persons for questioning in drug case it is necessary to go to its root says supriya sule aau 85 svk 88
Next Stories
1 विक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत
2 स्वच्छतागृहांचा व्यवसायासाठी वापर
3 वसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी
Just Now!
X