News Flash

पुण्यात ‘मे’ अखेरपर्यंत ५,००० करोनाबाधित रुग्ण असतील – महापालिका आयुक्त

१८ मे पासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील भागात अधिक प्रमाणात उद्योग-व्यवसाय सुरु होतील.

शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महापालिका

पुणे शहरात करोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. मागील पंधरा दिवसांपूर्वी शहरात आढळणार्‍या रुग्णांची संख्या लक्षात घेता ती मे अखेरपर्यंत ९ हजाराहून अधिक होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सध्या करोनाबाधित आणि डिस्चार्ज रुग्णांची संख्या लक्षात घेता मे अखेरपर्यंत ही रुग्णसंख्या सुमारे ५ हजारांपर्यंत असेल, अशी शक्यता महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली.

यावेळी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, पुणे शहरात काल अखेरपर्यंत ३ हजार ९३ इतकी रुग्णसंख्या होती. यांपैकी १ हजार ६३० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या पुणे शहरातील अनेक रूग्णालयात ५० टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत शहरात ५ हजार रुग्ण असतील अशी शक्यता त्यांनी व्यक्ती केली.

भविष्यात शहरात रुग्णसंख्या जरी वाढत राहिली तरी त्या प्रमाणात बरे होण्याचे प्रमाण देखील अधिक राहणार आहे. ही बाब आपल्या सर्वांच्या दृष्टीने समाधानाची आहे. दरम्यान, कालपर्यंत जिल्ह्यात १७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी आपल्या सर्वांच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही आयुक्त गायकवाड म्हणाले.

१८ मे पासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील भाग अधिक प्रमाणात सुरु होईल

शहरातील मध्य भाग मोठ्या प्रमाणावर करोनाच्या आजारानं संक्रमित झाला आहे. त्यामुळे आता १८ तारखेपर्यंत शासनाच्या निर्णयानुसार त्या भागात कोणत्या सुविधा द्यायच्या ते ठरविले जाणार आहे. मात्र, उर्वरित शहरातील काही भाग अधिक प्रमाणात सुरू होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

बालेवाडी येथील क्रीडा संकुलात १०० बेडची क्वारंटाइन व्यवस्था

पुणे शहरातील करोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालिका प्रशासनाने बालेवाडी येथे प्राथमिक १०० बेडची क्वारंटाइन सुविधा निर्माण केली आहे. ३१  मे नंतर या ठिकाणी रुग्ण पाठवले जाणार आहेत. मात्र, टप्प्या टप्प्याने १००० बेडपर्यंत ही व्यवस्था वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. यावेळी महापौरांसह महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी बालेवाडीतील क्वारंटाइन सेंटरला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 1:24 pm

Web Title: there will be 5000 patients in pune till the end of may says municipal commissioner shekhar gaikwad aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नागरिकांच्या अडचणीच्या काळात नगरसेवक गायब
2 घरपोच सेवा देण्यासाठी हॉटेलचालक सज्ज
3 बारामतीत वकील आणि पोलिसांमध्ये हाणामारी
Just Now!
X