हिंजवडीत उच्चभ्रू वस्तीत चोऱ्या चोराला अटक करण्यात आली आहे. दिवसा गाडी धुण्याचे काम करण्याचे काम हा चोर करायचा त्यामुळे त्याच्याकडे गाडीच्या चावीसोबत घराची चावी असे. हिंजवडीमध्ये अनेक उच्चभ्रू नागरिक रहात आहेत हे या चोराला माहित होते. त्यामुळे तो घरफोडी करु लागला. याच चोराला आता पोलिसांनी अटक केली. विकास सरोदे असे चोराचे नाव आहे. त्याच्याकडून 15 तोळे दागिने आणि लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला आहे. गाड्या धुण्याचे काम करत असताना अनेकदा त्याच्याकडे गाडीची चावी असे त्याला असलेली घराची चावी पाहून ठेवे आणि चोऱ्या करत असे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत अनेक संगणक अभियंते वास्तव्यास आहेत. हिंजवडी फेज तीन या ठिकाणी असलेल्या घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. ज्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पोलीस घरफोड्या करणाऱ्या चोरट्याच्या शोधातच होते.आरोपी विकास हा गाड्या धुण्याचे काम करत असल्याने त्याच्यावर कुणालाही सुरुवातीला संशय आला नाही. तो रात्री उशिरापर्यंत वसाहतीत थांबत असे आणि ज्या घरमालकाची गाडी नाही त्याच्या घरी घरफोडी करत असे अशी माहिती पोलीस अधिकारी मोहन शिंदे यांनी दिली. या भामट्याला पोलिसांनी हिंजवडीतून अटक केली.