News Flash

पुण्यातील हनुमान टेकडीवर तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न, एकाला अटक

या प्रकरणी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

प्रातिनिधीक छायाचित्र

पुण्यातील हनुमान टेकडीवर अभ्यास करण्यासाठी गेलेल्या एका तरुणीशी अश्लिल चाळे करून चोरट्याकडून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी गुरुवारी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या तरुणीकडील मोबाईल, एटीएम कार्ड, सॅक, पर्स, शूज चोरट्याने पळवून नेले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी ही तरुणी हनुमान टेकडीवर अभ्यास करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिथे आलेल्या २० ते २५ वर्षे वयाच्या एका चोरट्याने तिच्याशी अश्लिल चाळे करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. संबंधित तरुणीने त्याला प्रतिकार केल्यानंतर आरोपी तिच्याकडील मोबाईल, एटीएम कार्ड, सॅक, पर्स आणि तिचे शूज घेऊन तेथून पळून गेला. या घटनेमुळे घाबरलेल्या पीडित तरुणीने लगेचच पोलिसांकडे तक्रार दिली नाही. तिने सुरुवातीला हा प्रकार तिच्या मैत्रिणाला सांगितला आणि त्यानंतर वडिलांना सांगितले. वडिलांनी पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितल्यावर गुरुवारी संध्याकाळी तिने चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ही तरुणी मूळची पश्चिम बंगालमधील आहे. शिक्षणासाठी ती पुण्यात आली आहे.
चतुश्रुंगी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक एस. बी. पाटील पुढील तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 2:24 pm

Web Title: thieves try to rape a young lady in pune
Next Stories
1 BLOG : थ्री चियर्स फॉर गहुंजे!
2 स्मार्ट सिटीसाठी स्वतंत्र कंपनीच्या स्थापनेला महापालिकेची मंजुरी
3 पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, उपमहापौरपदी काँग्रेसचे मुकारी अलगुडे
Just Now!
X